मुंबई (प्रतिनिधी)- स्वाईन फ्लू आणि निमोनियाने अक्षरशः व्हेंटिलेटरवर असलेल्या एका प्रसुत महिलेने पालिकेच्या केईएम रुग्णालयात एका गोंडस मुलाला जन्म दिला. पुण्याहून या महिलेला केईएम रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आल्याची माहीती केईएम रुग्णालयाच्या प्रभारी अधिष्ठाता शुभांगी पारकर यांनी दिली
.
देशात स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. पुणे येथील एक २६ वर्षीय महिलेला या आजाराची लागण झाली असून ती गरोदर आहे. या महिलेवर उपचार करण्यासाठी नाशिक येथील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तेथे तिची परिस्थिती अत्यंत गंभीर होऊ लागल्याने तीला त्याच परिस्थितीत केईएम रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. या महिलेला १७ मार्च रोजी केईएम रुग्णालयात दाखल केले. गरोदर असलेल्या या महिलेच्या बाळाची सुखरूप प्रसुती करण्याची जोखीम केईएम रुग्णालयातील डॉ. परुळेकर यांच्या युनिटने घेवून अत्यंत गंभीर स्थितीत असलेल्या या महिलेची प्रसुती करण्यात आली. यावेळी तीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. सध्या या महिलेला एमआयसीयूमध्ये असली तरी तिच्या प्रकृत्ती सुधारणा होत आहे. तिच्या बाळासोबत तिचीही आजारातून सुखरूप सुटका करण्यासाठी केईएमचे डॉक्टर प्रयत्नशिल असल्याचे डॉ. पारकर यांनी सांगितले.
स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यु
स्वाईन फ्लूने मुंबईतील एकाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत ५२ रुग्ण आढळले असून त्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला जोगेश्वरी येथील असून तीला होली स्पिरीट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते