‘अंधेरीच्या राजा’ गणेशोत्सव मंडळाला मुंबईकर करदात्यांचे ५० लाख - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

‘अंधेरीच्या राजा’ गणेशोत्सव मंडळाला मुंबईकर करदात्यांचे ५० लाख

Share This
मुंबई – मुंबई महापालिकेत काँग्रेससह विरोधी पक्षांना अर्थसंकल्पातील निधीचे वाटप न करणा-या शिवसेनेने महापालिकेच्या तिजोरीतील करदात्यांचा पैसा गणेशोत्सव मंडळांना वाटायला निघाली आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी अर्थसंकल्पातील ५५० कोटींमध्ये १३ कोटींचा अतिरिक्त निधी स्वत:ला मिळवताना यातील ५० लाखांचा निधी अंधेरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या प्रवेशद्वारावर खर्च करण्यासाठी तरतूद केली आहे. यशोधर फणसे हे या मंडळाचे अध्यक्ष असल्याने त्यांनी ही तरतूद केली. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages