सुट्टय़ांमुळे २८ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान बँकांचे व्यवहार ठप्प होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सुट्टय़ांमुळे २८ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान बँकांचे व्यवहार ठप्प होणार

Share This
मुंबई : मार्च एण्डिंग आणि लागोपाठ आलेल्या सार्वजनिक सुट्टय़ांमुळे २८ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान बँकांचे व्यवहार ठप्प होऊ शकतात. नऊ दिवस बँकिंग क्षेत्र बंद राहिल्यास अर्थव्यवस्थेला कोट्यवधीचा फटका बसू शकतो. त्यामुळे बँकिंग व्यवहार रखडून त्याचा फटका सामान्यांप्रमाणे कंपन्यांनाही बसणार आहे. विशेष म्हणजे, या काळात एमटीएममध्ये पैसे काढण्यासाठी रांगा लागल्यानंतर तेथेही काही दिवसांनंतर खटखटाड होऊ शकतो.

२८ मार्च रोजी रामनवमी असल्यामुळे सार्वजनिक सुट्टी आहे. त्याच्या दुसर्‍या दिवशी रविवार आहे. ३0 मार्च रोजी सोमवार असल्यामुळे बँका खुल्या राहतील;परंतु ३१ मार्च आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस असल्यामुळे बँका आपले व्यवहार पूर्ण करण्यावर भर देतील, याचा फटका ग्राहकांना बसेल.

अशा प्रकारे मार्च महिन्याच्या अखेरीस चार दिवशी दोन सुट्टय़ा, कामाचा दीड दिवस असेल. आर्थिक वर्ष २0१५-१६ चा पहिला दिवस १ एप्रिल रोजी वार्षिक क्लोजिंग आहे. यामुळे या दिवशी काम कमी होण्याची शक्यता आहे. २ आणि ३ एप्रिल रोजी अनुक्रमे महावीर जयंती आणि गुड फ्रायडे असल्यामुळे सार्वजनिक सुट्टी आहे. ४ एप्रिल रोजी शनिवार असल्यामुळे बँका अर्धा दिवस खुल्या राहतील आणि ५ एप्रिल रोजी रविवार आहे. सलग आलेल्या सुट्टय़ांमुळे ६ एप्रिल रोजी बँकांवर कामाचा ताण येईल आणि वेतनसहित इतर व्यवहार विलंबाने होतील.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages