मुंबईचा विकास आराखडा सामान्यांच्या हिताचा नसेल तर तो चुलीत घाला - उद्धव ठाकरे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईचा विकास आराखडा सामान्यांच्या हिताचा नसेल तर तो चुलीत घाला - उद्धव ठाकरे

Share This
मुंबई - मुंबईचा विकास आराखडा हा सामान्य लोकांच्या हिताचा नसेल तर तो चुलीत घाला, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दम दिला आहे. ठाकरे मुंबईत एका कार्यक्रमात संबोधत होते. आधी खातीवाटप, नंतर एलईडी, नाईटलाईफ आणि आता मुंबईचा विकास आराखड्यावरुन शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा जुंपण्याची शक्यता आहे. 


उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईचा विकास आराखडा हा मराठी भाषेतच असला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगरविकास खात्याचाही अतिरिक्त कार्यभार असल्याने विकास आराखड्याचे स्वरुप आणि अंतिम मंजुरीचे अधिकार त्यांनाच आहे. विशेष म्हणजे हा आराखडा शिवसेनेचा नाही तर प्रशासनाचा आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages