मुंबई / अजेयकुमार जाधव
सफाई कर्मचाऱ्यांना मोफत मालकी हक्काची घरे मिळावीत म्हणून राज्य सरकारने 22 ओक्टोबर 2008 रोजी शासन ठराव मंजूर केला आहे. मात्र या अटी चुकीच्या असून शासकीय ठरावाच्या हेतुला मारक आहेत. चुकीच्या अटी रद्द कराव्यात म्हणून मुंबई म्युनिसिपल कामगार संघाच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानात मोर्चा काढण्यात आला.
शासनाने केलेला ठराव सर्व खात्यातील सफाई कामगारांना लागु असून महानगर पालिका प्रशासन मात्र ही योजना पलिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना लागु करण्याचा विचार करत नाही. शिष्टमंडळा बरोबर चर्चा करताना डॉ. आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनेची माहिती देवून फ़क्त सेवा निवास स्थाने देण्याची चर्चा केली गेल्याने याबाबत तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला.
22 ओक्टोबर 2008 पासून सेवा निवृत्त झालेल्या प्रत्तेक सफाई कामगारांना घरे मिळावी, 22 ओक्टोबर 2008 नंतर सेवा निवृत्त झालेल्या कामगार किंवा त्यांच्या वारसाना घरे मिळावीत, घरे मोफत मालकी हक्काची कायम मिळावीत, मोफत घरांचा निधी कामगारांच्या मालकी हक्काच्या मोफत घरांकरीता आहे हा निधी सेवा निवास स्थानासाठी नाही यात गैरव्यव्हार करू नये, कामगारांना घरे मुंबई मध्येच मिळावित, पकिकेच्या सर्व खात्यातील सफाई कामगारांना घरे मिळावित, पलिकेच्या 7 क च्या वस्त्या, सेवा निवास स्थानाच्या जागा, बाजार, पालिकेच्या पडीक जागा, शासनाकडून बिल्डर कडून उपलब्ध जागा सदनिका याचा वापर मालकी हकाच्या घरांसाठी करावा इत्यादी मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या वेळी जयश्री खाडिलकर, आनंदराज आंबेडकर, गोविन्द परमार, सुभाष पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
