म्हाडा सोडतीची जाहिरात ६ एप्रिलला - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

म्हाडा सोडतीची जाहिरात ६ एप्रिलला

Share This
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या मे २0१५ रोजी पार पडणार्‍या ९८९ घरांच्या सोडतीची जाहिरात ६ एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार असून या जाहिरातीबरोबरच म्हाडाच्या घरांचा मराठी भाषेतील व्हिडीओ प्रसिद्ध होणार आहे. म्हाडाच्या सोडतीत अत्याधुनिक यंत्रप्रणालीचा समावेश करून पारदर्शक कार्यपद्धतीचा अवलंब करण्यासाठी दरवर्षी प्रयत्न करण्यात येतो. सोडतीत समाविष्ट करण्यात आलेल्या घरांची माहिती घरबसल्या अर्जदारांना मिळावी, यासाठी घरांचे क्षेत्रफळ, रंग, टाईल्स यासाठी व्हिडीओ बनविण्यात आला आहे. मराठीतून असलेल्या या व्हिडीओची माहिती ६ एप्रिल रोजी जाहिरातीच्या वेळेस प्रसिद्ध होणार आहे. 
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून ३१ मे रोजी ९८९ घरांची सोडत जाहीर करण्यात येणार आहे. या सोडतीत सर्वसामान्यांचा प्रतिसाद वाढावा यासाठी नवनवीन उपायायोजना राबवण्यात येत आहेत. म्हाडाच्या माध्यमातून अर्जदारांना रंगशारदा सभागृहात उपस्थित राहण्याची सोय करण्यात येते, मात्र नोकरदार अर्जदारांना यात सहभागी होता येत नाही. त्यामुळे गेल्या वर्षी सोडत ऑनलाईन दाखवण्याची सोय उपलब्ध करण्यात आली होती. सोडतीत अर्जदारांना कर्जप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डायरेक्ट ताबा मिळाल्यावर घरांचे दर्शन होते, मात्र तोपर्यंत घरांची माहिती अर्जदारांना उपलब्ध होत नाही. त्यामुळेच यंदाही ही सोडत अर्जदारांना अविस्मरणीय करण्यासाठी घरांची माहिती देणारा व्हिडीओ लक्षवेधी ठरणार आहे. यंदा सोडतीत गव्हाणपाडा मध्यम उत्पन्न गट १८५ घरे, अत्यल्प उत्पन्न गट १७४, प्रतीक्षानगर मध्यम उत्पन्न गट ५६, उन्नतनगर गोरेगाव अल्प उत्पन्न गट १८२ , अत्यल्प उत्पन्न गट ९४, मानखुर्द अत्यल्प उत्पन्न गट ६६ घरे, मालाड अल्प उत्पन्न गट २३२ घरे सोडतीत उपलब्ध होणार आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages