मौलाना आझाद अल्पसंख्यांक महामंडळाची चौकशी व्हावी.
जिल्हास्तरावर अल्पसंख्यांक सद्भावना समित्या स्थापन करा.
मुंबई दि. २६ – मुंबईचे नगरपाल पद गेली अनेक वर्षे रिक्त असून हे पद मुंबईच्या दृष्टीने प्रतिष्ठेचे आहे त्यामुळे येत्या 3 महिन्यांत तत्काळ या पदावर नियुक्ती करण्यात यावी अशी आग्रही मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली.
विधानसभेत आज राज्याच्या अर्थसंकल्पातील सामान्य प्रशासन,सार्वजनिक बांधकाम, अल्पसंख्यांक विकास, कौशल्य विकास यासह अन्य विभागावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत सहभागी होताना आमदार आशिष शेलार यांनी मुंबईसह वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातील काही महत्वाच्या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधले.
मुंबईचे क्षेत्रफळ मर्यादित आहे त्यामुळे मुंबईला वाचवले पाहिजे,मूळ मुंबईकरांच्या हिताचे रक्षण झाले पाहिजे. लोकसंख्येला मर्यादा असायला हवी त्यासोबतच घटनेने सर्वाना कुठेही जाण्याचा अधिकार दिला आहे त्यामुळे कायद्याने कोणाला रोखाताही येणार नाही. मग राज्याच्या सन २०१५-१६ च्या कार्यक्रम अंदाज पत्रकात, सामान्य प्रशासन विभागाच्या विषय पत्रिकेत कार्यासन क्र. २९ – अ मध्ये मुंबईत येणाऱ्या परप्रांतीयांचे लोंढे रोखण्यासाठी करण्यात येणारी उपाययोजना करण्याबाबत अशी तरतूद प्रशासनाने कशासाठी केली आहे. यापूर्वी अशी कोणती कारवाई झालेली नाही. मग हे सरकार या हेड खाली कोणत्या उपाययोजना करणार आहे? लोंढे म्हणजे नेमके काय? असे प्रश्न आमदार आशिष शेलार यांनी यावेळी उपस्थित केले. तर याबाबत नंतर बोलताना ते म्हणाले की असा कार्यक्रम यापुर्वी च्या सरकारने राबविला होता का त्या अंतर्गत कोणती उपाययोजना करण्यात आल्या याची माहिती त्यांनी सरकारला देण्याची विनंती केल्याचे सांगितले
अल्पसंख्याक विभागावर बोलताना गेल्या दहा वर्षात मौलाना आझाद विकास महामंडळत झालेल्या गैरव्यवहाराकडे लक्ष वेधले. या महामंडळाची गेल्या दहा वर्षात अॅडीट झालेले नाही. तसेच मुंबईतील दोन विधानसभा मतदार संघात अडीच हजार लोकांना पैशाचे वाटप करण्यात आले तेही एका विशीष्ट समाजगटातील लोकांना वाटप करण्यात आले. तर उरलेल्या ३४ मतदार संघात केवळ ३०० विद्यार्थ्यांना महामंडळाकडून पैसे देण्यात आले ही बाब गंभीर असून याची सरकारने चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. तर अर्थसंकल्पात सांप्रदायिक सद्भावना परिषद स्थापन करण्यात येत असल्याचा उल्लेख असून या परिषदेचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री असतात. नवीन पनवेल मध्ये नुकत्याच झालेल्या चर्चवरील हल्ल्यातील सर्व आरोपी ४८ तासाच्या आत पकडून सरकारने अल्पसंख्यांक समाजामध्ये चांगला संदेश दिला आहे. त्याबद्दल आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले त्या सोबतच त्यांनी सांप्रदायिक सद्भावना परिषद सारख्या कमिट्या जिल्हापातळीवर नियुक्त करण्यात याव्यात आणि अल्पसंख्यांक समाजाला संवाद साधण्यासाठी, आपले म्हणणे मांडण्यासाठी एक व्यसपीठ उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आमदार शेलार यांनी केली. तसेच आंध्रप्रदेशच्या धर्तीवर राज्याच्या अर्थसंकल्पात ख्रिश्चन समाजबांधवाना त्यांच्या धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठीची तरतूद करावी अशी मागणी केली.
तर सामान्य प्रशासन विभगावर बोलताना त्यांनी मतदार याद्यांत नेहमीच होणारा घोळ लक्षात घेता मतदार याद्या ऑन लाईन उपलब्ध करून द्याव्यात आणि त्यातील घोळ संपवावा असे ही सूचित केले. ई-गव्हर्नन्स चा वापर सरकार करत असून आरटीआय ऑन लाईन करण्याचा मानस या अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला आहे त्यासाठी कन्सलटंट नियुक्त करण्यात आला आहे का ? अशा प्रकारचा पोर्टल डेव्हलप करण्यात येणार आहे का ? याबाबतची स्पष्ट माहिती देण्यात यावी अशी मागणी केली. तर मुंबईच्या नगरपालांची नियुक्ती गेल्या अनेक वर्षात झालेली नाही. ही नियुक्ती येत्या 3 महिन्यात तत्काळ करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) या विभागावर बोलताना वांद्रे येथे सीलिंक जवळ प्रोमोनेड डेव्हलप करण्यासाठी एक जागा 6 वर्षांपूर्वी डी.बी. रीअल्टीज यांना देण्यात आली होती. हे काम 3 वर्षात पूर्ण होणार होते मात्र 6 वर्षे झाली तरी हे काम पूर्ण झालेले नाही. त्याबदल्यात जाहिराती मात्र झळकू लागल्या आहेत. या बदल्यात ही कंपनी एक आर्ट गॅलरीसह काही सोई सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणार होती. या जागेवर सध्या बांधकाम साहित्य पडल्यामुळे मोर्निग वॉक ला जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. एक चांगला टुरिस्ट स्पॉट डेव्हलप करण्याची ही एक चांगली योजना होती मात्र रखडल्यामुळे नागरीकांची गैरसोय होते आहे ती तत्काळ दूर करून प्रकल्प तत्काळ पूर्ण करावा अशी मागणी केली. तर याच सीलिंक जवळ एमएसआरडीसी चा 30 एकरचा भूखंड अर्धवट कंपाऊंड वॉल घालून ठेवण्यात आला आहे. नर्गिस दत्त नगरच्या शेजारी असणाऱ्या या भूखंडावर झालेले झोपड्यांचे अतिक्रमण एकदा दूर करण्यात आले. या जागेवर एक थीम पार्क उभे करण्याचा प्रस्ताव या विभागातील स्थानिक संस्थांनी दिला आहे. पीपीपी तत्वावर उभे राहणारे थीम पार्क नागरिकांसाठी मोफत असून त्याला तत्वता मान्यता देण्यात आली आहे. मात्र त्यापुढील कार्यवाही न झाल्यामुळे त्या भूखंडावर पुन्हा झोपड्यांचे अतिक्रमण होण्याची भीती आहे. अशी माहिती देत हे थीम पार्क वेळेत पूर्ण करावे अशी मागणी केली.
कौशल्य विकास विभगावर बोलताना आमदार आशिष शेलार यांनी खार पश्चिम, १७ वा रस्ता येथील आयटीआय च्या जागेचा विषय मांडला या जागी आर.व्ही. टेक्निकल हायस्कूल असून बाजार भावा नुसार या भूखंडाची किंमत सुमारे 300 कोटीच्या घरात आहे. ही जागा रुस्तमजी या विकासकाला पीपीपी तत्वावर डेव्हलप करण्यास देण्यात आली आहे. या जागेचा विकास होताना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत ट्रेनिंग सेंटर उभे राहावे अशी मागणीही आमदार आशिष शेलार यांनी केली.