मुंबई (प्रतिनिधी)- पालिका नगरसेवकांनावाटप करण्यात आलेल्या विकासनिधीचे असमान वाटप केल्याचा वाद आता न्यायालयात गेलाआहे. कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असून पालिकाआयुक्त सीताराम कुंटे आणि स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांच्याविरोधात याचिकादाखल केली आहे.
पालिकेतील विविध राजकीय पक्षांच्या नगरसेवकांना दरवर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद केलीजाते. यंदा ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यानिधीच्या वाटपात गोलमाल झाला आहे. कॉंग्रेसेचे नगरसेवकांनी या विरोधात आठ दिवससभागृहात तीव्र विरोध केलाहोता. तसेचजोरदार घोषणाबाजी करीत शिवसेना आणि भाजपावरआसूड ओढले होते. यावेळी ५०० कोटी रुपयांमधून बेस्टला १०० कोटी, २२७नगरसेवकांनाप्रत्येकी १ कोटी रुपये, राष्ट्रवादी कॉंग्रेसला ७ कोटी, मनसेला ५ कोटी, भाजपाला ३२कोटी, समाजवादी पक्षाला ५कोटी रुपये आणि कॉंग्रेसला ७कोटी निधीचा वाटप केला. तरस्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनीशिवसेनेकरीता ११७ कोटी रुपये निधी राखूनठेवल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी सांगितले. कॉंग्रेस पक्षाच्यावतीने नगरसेवक आसिफ झकेरीया आणि नगरसेविकाशितल म्हात्रे यांनीप्रशासनाच्या व स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांच्या विरोधात याचिका दाखल केलीअसल्याचे माहीतीआंबेरकर यांनी दिली.