मुंबईत दोन दिवस १० टक्के पाणीकपात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत दोन दिवस १० टक्के पाणीकपात

Share This
मुंबई (प्रतिनिधी)- मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या उदचंद केंद्राचे दुरुस्ती करण्यात येणार असल्याने २४ आणि २५ मार्च रोजी १० टक्के पाणी कपात केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पाणी संकट ओढावणार आहे. मंगळवारी या उदचंद केंद्राच्या दुरुस्ती कामाला सुरुवात होणार असल्याचे पालिकेच्या जलविभागाने सांगितले आहे. तरी नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून पाणी काटकसरीने वापरुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जल विभागाने केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages