मुंबई महापालिकेची फसवणूक करणाऱ्या जकात अधीक्षकाला अभय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 March 2015

मुंबई महापालिकेची फसवणूक करणाऱ्या जकात अधीक्षकाला अभय

मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिकेच्या जकात विभागात अधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या राजेंद्र देवकुळे यांनी पालिकेकडून कर्जामधून घेतलेली सदनिका पालिकेला अंधारात ठेवून विकली आहे. पालिकेची देवकुळे यांनी फसवणूक केल्याचे त्यांच्या पत्नी सुवर्णा देवकुळे यांनी पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या निदर्शनास आणूनही अद्याप कोणतीही कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मुंबई महानगर पालिकेमध्ये राजेंद्र देवकुळे हे सध्या अधीक्षक म्हणून जकात विभागातील ऐरोली मुलुंड जकात नाक्यावर कार्यरत आहेत. देवकुळे यांनी सन १९९९ मध्ये पालिकेच्या नियमा प्रमाणे पालिकेकडून ८० टक्के कर्ज घेवून मुलुंड पश्चिम मुलुंड कॉलनी येथे मुलुंड दर्शन ए आय को.ऑप. हौ. सो.लि.येथे सदनिका घेतली होती. त्यासाठी पालिकेकडे गहाणखताचा करारनामा केला होता. तरीही आपण वरिष्ठ अधिकारी आहोत आपले काय कोण बिघडवणार अश्या धुंदी मध्ये असलेल्या देवकुळे यांनी पालिकेला अंधारात ठेवून हि सदनिका विकली आहे. देवकुळे हे पालिकेची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांच्या पत्नी सुवर्णा देवकुळे यांनी पालिकेच्या संबंधित विभागांकडून माहिती अधिकारात माहिती मागवून १ एप्रिल २०१४ पासून सातत्याने तक्रार करत आहेत.

सुवर्णा देवकुळे यांनी तक्रार केल्यावर उप प्रमुख लेखापाल कवडे यांनी पालिकेच्या उपकरनिर्धारक व संकलक विभागाला पत्र पाठवून १८/ ७ /२०१४ ला देवकुळे यांचे म्हणणे मांडण्यासाठी पत्र पाठविले आहे. परंतू त्या बाबत अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. याच दरम्यान देवकुळे यांनी पालिकेकडून कर्ज घेवून घेतलेली सदनिका विकली असल्याचे उपप्रमुख लेखापाल ( गृहकर्ज विभाग ) यांच्या ५ /८ / २०१४ च्या अहवालात म्हटले आहे. देवकुळे यांनी हि सदनिका विकण्या पूर्वी ७ लाख ८४ हजार १८८ रुपये पालिकेचेया सदनिकेवर असलेले कर्ज परत फेडलेले नाही. हि रक्कम वसूल करण्यासाठी आणि पालिकेची फसवणूक करणाऱ्या देवकुळे यांच्यावर पालिका अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्या नेत्यांच्या पत्नी सुवर्णा देवकुळे यांनी पालिका आयुक्त तसेच स्थायी समिती अध्यक्ष यांच्या कडे लेखी तक्रार करून न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

Post Bottom Ad