मुंबई / प्रतिनिधी - देवनार पशुवध गृहामधे जनावरे आणने आणि बाहेर नेयाच्या दारात 10 टक्के वाढीचा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समिती मधे मंजूर केल्याने एप्रिल पासून मटनाचे दर वाढणार आहेत.
मुंबई महानगर पालिकेच्या देवनार पशुवध गृहामधे शृंगीसाठी 484 रुपये , शेल्या मेंढ्यासाठी 49 रुपये तर डूक्करासाठी 61 रूपये दर आकारला जात आहे. पालिकेने10 टक्के दर वाढवन्यास स्थायी मंजूरी दिल्याने आता पशुवधगृहात शृंगी साठी 533, शेल्या मेंढ्यासाठी 54 रुपये, डुक्करासाठी 68 रुपये दर आकारला जाणार आहे. पशुवध गृहामधे पशु आणण्याचे आणि बाहेर नेण्याचे दर एप्रिल महिन्या पासून वाढणार असल्याने याचा परिणाम म्हणून मुंबई मधील मटणाचा दर वाढणार आहे.
