भुयारी मार्गासाठी मानखुर्दमध्ये रेल रोको - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भुयारी मार्गासाठी मानखुर्दमध्ये रेल रोको

Share This
मुंबई : मानुखर्द येथील महात्मा फुले नगरमधील रहिवाशांनी फलाट क्र. १ आणि २खालून भुयारी मार्ग बांधून द्यावा, यासाठी बुधवारी सकाळी रेल रोको आंदोलन केले. हजारोंच्या संख्येने नागरिक रेल्वे रुळावर उतरले होते,यामुळे हार्बरवरची वाहतूक विस्कळीत झाल्याने वरिष्ठ पातळीवर आंदोलनाची दखल घेण्यात आली. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस. के.सूद यांनी चर्चेसाठी निमंत्रण दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 
मानुखर्द रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणाचे काम सध्या सुरू आहे, यामुळे रहदारीचा मार्ग बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी रेल्वे मार्गाखालून भुयारी मार्ग बांधून द्यावा, अशी रहिवाशांची मागणी आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने रहिवाशांनी रेल रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे हार्बरवरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली. या वेळी मानखुर्द पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश गोसावी, ट्रॉम्बेचे पिरजादे, आरपीएफचे पांडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

भुयारी मार्गास तत्त्वत: मान्यता मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस. के. सूद यांनी मानुखर्द रेल्वे स्थानकाजवळ भुयारी मार्ग उभारण्यास एनओसी देण्याचे तत्त्वत: मान्य केले..याबाबत महानगरपालिकेकडून प्रस्ताव आल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्‍वासन सूद यांनी दिले तसेच जलवाहिनी आणि महानगरपालिकेला हव्या असलेल्या इतर बाबींसाठी ही एनओसी देण्याचे त्यांनी मान्य केले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages