मुंबई / प्रतिनीधी - मुंबई मधील झाडांची गणना पालिकेकडून सुरु आहे. आता मेट्रो मुले चर्चित असलेल्या आरे मधील झाडांची गणना करण्यास स्थायी समिती मधे मंजूरी देण्यात आली आहे.
मुंबई महानगर पालिकेने जानेवारी 2014 च्या प्रस्तावा नुसार 21 लाख झाडे मोज्ण्यासाठी सार आयटी या कंपनीला एका झाडाला 9 रुपये 90 पैसे या दराने 2 करोड़ 7 लाख 90 हजार रुपयांचे कंत्राट दिले आहे. गेल्या वर्षभरात 13 प्राभागात 14 लाख झाडांची गणना करण्यात आली आहे. बुधवारी आरे मधील झाडांची गणना करण्यासाठी प्रती झाड 9 रुपये 90 पैसे या दराने 5 लाख झाडे मोजण्यासाठी 49 लाख 50 हजार रुपयांचे कंत्राट देण्यास स्थायी समितीने मंजूरी दिली आहे.
