"चिन्हांकीत अर्थमंत्र्यांचा प्रश्नांकीत अर्थसंकल्प' - राधाकृष्ण विखे पाटील - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 March 2015

"चिन्हांकीत अर्थमंत्र्यांचा प्रश्नांकीत अर्थसंकल्प' - राधाकृष्ण विखे पाटील

अर्थसंकल्पाचे वर्णन करायचे झाल्यास हा "चिन्हांकीत अर्थमंत्र्यांचा प्रश्नांकीत अर्थसंकल्प'आहे. त्यात अर्थ कमी आणि काव्यच जास्त होते. गारपीटअवकाळी पाऊस आणि दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीत सापडलेला शेतकरी मोठ्या अपेक्षेने या सरकारकडे पाहत होतामात्र या सरकारने त्यांची घोरनिराशा केली आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना केली होती. परंतु या विषयाचे गांभिर्यच या सरकारला नसल्याने त्याचा कोणताही उल्लेख या अर्थसंकल्पात नव्हता. शेतकऱ्यांना मदत करण्यापेक्षा त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकारने केले आहे. एकूणच अर्थसंकल्पात कल्पकता कमी दिसते आहे. अर्थमंत्र्यांनी सर्व वेळ शेरोशायरीत घालवून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची चांगली संधी गमावली. कोणत्या योजनांना प्राधान्य द्यावे याबाबत अर्थमंत्र्यांच्या मनात संदिग्धता स्पष्ट दिसते अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. 

दुध उत्पादक अडचणीत आहे. लहरी हवामानामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला या दुधाच्या जोडधंद्यातून मदत होते. त्यामुळे त्यावर त्वरीत उपाययोजना करणे गरजेचे असतानाही सरकार फक्त आश्वासने देत आहे. तीच स्थिती कापुस उत्पादकआणि उस उत्पादक शेतकऱ्याची आहे. कायमस्वरूपी दुष्काळ हटवण्यासाठी गेल्या सरकारने केलेल्या उपाययोजनाच या सरकारने नव्या नावाने घोषित केल्या आहेत. एकप्रकारे शेतकऱ्यांच्या दृष्टीने निराशाजनक असा हा अर्थसंकल्प आहे. शेतकरी आत्महत्यांबाबत उपाययोजनांसाठीच्या तरतुदीचे एक अक्षरही या अर्थसंकल्पात नाही हे दुर्दैव आहे. याच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मु्द्याचे राजकारण करून हे सरकार सत्तेवर आले पण त्यांनाही काही दिले नाही. राज्यातल्याशेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढाव्यात असा या सरकारचा प्रयत्न आहे काउद्यापासून आम्ही सर्व कामकाज बाजुला ठेवून याबद्दल सरकारला जाब विचारणार आहाेत असे विखे पाटील यांनी सांगितले. 

विरोधी पक्ष नेत्यांनी उपस्थित केलेले प्रश्न?टोल रद्द् करण्याच्या घोषणेचे काय झालेत्याचा उल्लेख या अर्थसंकल्पात का नाहीएलबीटी पंधरा दिवसांत रद्द करणार होतेत्याचे काय झालेत्याचा अजून अभ्यास सुरू आहे कामहिलांच्या पर्स आणि बॅगवरील व्हॅटमध्ये कपात केलीम्हणजे आता आमच्या ग्रामीण भागातल्या माताभगीनींनी फक्त पर्स विकत घेऊन समाधान मानायचे काग्रामीण भागात प्रत्येक जिल्ह्यात नाट्यगृह उभे करून आपण कोणती नाटके करणार आहातबाबासाहेबांच्या लंडनमधील घराच्या खरेदीसाठी कोणतीही तरतूद या अर्थसंकल्पात का नाही ?

Post Bottom Ad