मुंबईकर नागरिकांची फसवणुक करणाऱ्या मुख्यमंत्र्यानी माफ़ी मागावी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईकर नागरिकांची फसवणुक करणाऱ्या मुख्यमंत्र्यानी माफ़ी मागावी

Share This
मुंबई । अजेयकुमार जाधव 
मुंबईचा विकास आराखडा राज्य सरकारने रद्द केला असे मुख्यमंत्र्यानी म्हटले असले तरी हा आराखडा रद्द करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्रानी मुंबईकर नागरीकाना खोटी माहिती दिली आहे. ही मुंबईकर जनतेची शुद्ध फसवणुक असल्याने मुख्यमंत्री देवेन्द्र फडवनीस यांनी मुंबईकर जनतेची माफ़ी मागावी असे आवाहन कोंग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केले. 

मुंबईचा विकास आराखडा रद्द करावा असा आग्रह राजकीय पक्ष, सामाजीक संस्था, आर्कीटेक्ट, इत्यादी सर्वानी केला होता. या आग्रहाची दखल घेवुन मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवा जीआर काढून विकास आराखडा रद्द करावा आणि असा चुकीचा आराखडा बनवाणार्या पालिका आयुक्त सिताराम कुंटे व पालिका अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, कुंटे यांची नुसती बदली करून चालणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी संजय निरुपम यांनी केली.

तर महापालिकेने बनवलेला विकास आराखडा चुका काढून परत पाठवता येतो. तो आराखडा रद्द करता येत नाही. असे असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आराखडा रद्द केल्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांचे वकतव्य निषेध करण्यासारखे आहे. विकास आराखडयाच्या निमित्ताने भाजपा शिवसेनेमधील आपसातील भांडण समोर आले आहे. हा आराखडा शिवसेनेनेच्या मर्जीनुसार बनला असल्याने भाजपा हा आराखडा रद्द करत आहे असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सांगीतले.

आजही मुंबई मधील आरक्षणे बदलण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे सचीव मिलींद नार्वेकर बिल्डराना फोन करत आहे. आराखड्यामधील आरक्षणामधे बदल करण्याच्या नावाने करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे असा आरोप राणे यांनी केला आहे.


Post Bottom Ad

JPN NEWS

Pages