नेपाळ मधील भूकंपग्रस्तांसाठी रामदास आठवलेंचे दोन महिन्यांचे वेतन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नेपाळ मधील भूकंपग्रस्तांसाठी रामदास आठवलेंचे दोन महिन्यांचे वेतन

Share This
दिनांक २७ः-   नेपाळमध्ये झालेल्या  भूकंपाने नेपाळवासीयांवर जे अस्मानी संकट कोसळले आहे त्यामध्ये मृत्यु पावलेल्या निष्पाप नागरिकांना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी मदत म्हणून  आपले दोन महिन्यांचे वेतन देण्याचा निर्णय आज जाहीर केला. नेपाळमधील नागरिकांच्या दुःखात आपण व आपला पक्ष सहभागी असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारने परवानगी दिल्यास आपल्या खासदार निधीमधून एक कोटी रुपयांची मदत करण्यास आपण तयार असल्याचे ते म्हणाले.


सरकारने परवानगी दिल्यास सर्व खासदारांनी आपल्या खासदार स्थानिक विकास निधीमधून एक कोटी रुपयांची मदत द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.नेपाळमधील भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना  आठवले यांनी श्रध्दांजली अर्पण केली. या भूकंपामध्ये हजारो नागरिक मृत्युमुखी पडले तर लाखो नागरिक बेघर झाले आहेत.  नेपाळवासीयांवर कोसळलेल्या या आपत्तीचा सामना करण्यासाठी व नेपाळवासीयांना मदत मिळून त्यांचे पुनर्वसन होण्यासाठी देशातील सर्व खासदार, आमदार, मंत्री, राज्यमंत्री यांनी आपापले एक महिन्याचे वेतन नेपाळवासीयांना द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.नेपाळमधील भूकंपात अनेक गावे, शहरे उध्द्वस्त झाली आहेत, त्यामुळे त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी देशातील उद्योगपतींनी पुढाकार घ्यावा व एक एक गाव दत्तक घ्यावे, असे त्यांनी सुचवले.  नेपाळमधील नागिरकांवर कोसळलेले हे आरिष्ट लवकर दूर व्हावे व या नागरिकांना स्वस्थ जीवन जगता यावे यासाठी त्यांना सर्वोतोपरी मदत करण्याची मागणी खासदार आठवले यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन त्वरित नेपाळला मदत जाहीर केल्याबद्दल आठवले यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.नेपाळमधील भूकंपपीडितांना मदत पाठवण्यासाठी पक्षातर्फे एक ट्रक  साहित्य पाठवले जाणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages