मुंबई - कोकणचे हिरोशिमा, चर्नोबिल आणि नेपाळ होऊ द्यायचे नसेल तर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प तातडीने रद्द करावा. हा प्रकल्प कोकणच्या हिताचा नसल्याने तो तत्काळ रद्द झाला पाहिजे, अशी मागणी करतानाच जर्मनीत अणू प्रकल्पाविरोधात ज्याप्रमाणे सर्वच राजकीय पक्ष एकवटले त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी या प्रकल्पाविरोधात एकवटले पाहिजे, असे आवाहन जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी जनहक्क सेवा समितीने केले आहे.
या परिसरात २० वर्षांत ९३ धक्के बसले असून तसा चक्रवर्ती समितीचा अहवाल आहे. जैतापूरमध्ये जांबा दगडाचे पठार आहे. त्यावर अणू प्रकल्पाचे रिऍक्टर उभे राहू शकत नाही. रिऍक्टरसाठी लागणारा काळा दगड समुद्रसपाटीखाली आहे. त्यासाठी जांबाचे पठार काढावे लागेल. त्यामुळे सुनामी येऊ शकते. जैतापूरला भूकंपाचा धक्का बसला तर मुंबईलाही किरणोत्सर्गाचा धोका पोहोचेल, असा इशाराही राऊत यांनी दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जशी ठोस आणि खंबीर भूमिका घेऊन जैतापूर प्रकल्पाला विरोध केला तशीच ठोस भूमिका इतर राजकीय पक्षांनी घ्यावी. भाजपनेही हीच भूमिका घ्यावी, असे आवाहन राऊत यांनी केले.
२०१३ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अणू प्रकल्प समितीसोबत अमेरिकेला गेले तेव्हा अमेरिकेच्या सिनेट कमिटीला त्यांनी जैतापूर प्रकल्प अमेरिकेत का करत नाही, असा सवाल केला. त्यावर १९७९ पासून अमेरिकेत एकही अणुभट्टी लावण्यात आली नाही. पर्यावरण आणि आर्थिकदृष्ट्या ते परवडणारे नसल्याचे सिनेट सदस्यांनी सांगितले. तेव्हा मग हा प्रकल्प आमच्या देशात का आणता, असा प्रश्न फडणवीस यांनी केला असता हा तुमच्या देशाचा प्रश्न आहे, त्यावर तुम्ही निर्णय घ्यायचा आहे, असे फडणवीस यांना उत्तर देण्यात आले होते. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीस आता गप्प का ? असा सवाल गिरीश राऊत यांनी केला.