सफाई कामगारांना मिळमा-या अनेक सुविधा आणि लाभांपासून वंचित असलेल्या ड्रेनेज सफाई कामगारांना न्याय देण्याचा प्रश्न हा महापालिकेच्या धोरणाशी संबंधित आहे. त्यामुळे या कामगारांच्या मागण्या आपण महापालिका आयुक्तांकडे पाठवू, असे आश्वासन परळ येथील पालिका उपायुक्त आनंद वगराळकर यांनी बुधवारी ड्रेनेज कामगार संघर्ष समितीला दिले.
संघर्ष समितीतर्फे परळच्या एफ/दक्षिण विभाग कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी निदर्शन करण्यात आली. त्याचे नेतृत्व त्या समितीचे संयोजक सिताराम लव्हांडे आणि महेंद्र जाधव यांनी केले. या आंदोलनाला पालिकेच्या इतर विभागातील सफाई कामगार आले होते. यामुळे सर्वच वॉर्डमध्ये ड्रेनेज कामगारांचे आंदोलन होणार आहे. वारसाला हक्काने नोकरी, महापालिकेचे घर, विमा, आरोग्य, सुविधा या सफाई कामगारांप्रमाणे आपणांसही लागू व्हाव्यात. तसेच महाराष्ट्र सरकार तर्फे देण्यात येणा-या हक्काच्या घरांच्या योजनेत समावेश करावा, या ड्रेनेज कामगारांच्या प्रमुख मागण्या आहेत