विकास आराखड्यातुन चैत्यभूमी गायब - पालिका मुख्यालयात रिपब्लिकन सेनेची निदर्शने - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विकास आराखड्यातुन चैत्यभूमी गायब - पालिका मुख्यालयात रिपब्लिकन सेनेची निदर्शने

Share This
मुंबई । अजेयकुमार जाधव 
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असलेली चैत्यभूमी मुंबईच्या नव्या विकास आराखड्यातुन पालिकेने गायब केल्याने शुक्रवारी पालिका मुख्यालयात रिपब्लिकन सेनेच्या वतीने महापौर आणि आयुक्त कार्यालयाला घेराव घालण्यात येवून तीव्र निदर्शने केली

मुंबईचा सन 2014 ते 2034 चा विकास आराखडा बनवला जात आहे. हा आराखडा सुचना व् हरकतीसाठी सादर करण्यात आला आहे. या आराखड्यात असंख्य चुका करण्यात आल्या आहेत. मुंबई महानगर पालिका ज्या भारत देशात आहे. ज्या देशाचे संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकर यानी लीहीले आहे. त्या संविधान निर्मात्या बाबासाहेबांची चैत्यभुमी मुंबईच्या नविन विकास आरखडयात दर्शाविन्यात आलेली नाही.

डॉ आंबेडकर यांच्या चैत्यभूमी स्मारकाच्या जागेवर इतर सामाजिक कामासाठी राखीव जागा अशी नोंद टाकण्यात आली आहे. ही बाब रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच मुंबई अध्यक्ष रमेश जाधव, भगवान् साळवी, भीमराज जगताप, अविनाश कांबळे , दीपक गायकवाड यांच्या नेतृत्वा खाली महापौर आणि पालिका आयुक्त कार्यालयावर धडक देवून निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाची दखल महापौर स्नेहल आंबेकर यानी घेत आयुक्ताना पत्र देवून तातडीने खुलासा करण्यास सांगीतले आहे. तसेच नविन विकास आराख्ड्यात चैत्यभूमीचा समावेश करावा असे आदेश प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान चैत्यभूमी विकास आराखड्यात नसल्याचा कोणताही प्रकार झाला नसल्याचे पालिका आयुक्तांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages