भाऊ दाजी संग्राहलय बजाज फाऊंडेशनबरोबरचा करार रद्द करण्याचा निर्णय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भाऊ दाजी संग्राहलय बजाज फाऊंडेशनबरोबरचा करार रद्द करण्याचा निर्णय

Share This
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरची मालमत्ता असलेले भायखळा येथील भाऊ दाजी लाड संग्राहलय या संदर्भात बजाज  फाऊंडेशनबरोबर सन २००२ मध्ये झालेली अग्रीमेंट रद्द करण्याचा निर्णय आज पालिका सभाग्रहात घेण्यात आला. येत्या सहा महिन्यात नवीन अग्रीमेंट करणार असल्याचे महापौर स्नेहल आंबेकर यांनी सांगितले. या वेळी सभाग्रह नेत्या तृष्णा विश्वासराव तसेच स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे उपस्थित होते. 

भाऊ दाजी लाड फाऊंडेशनबरोबर व्यवस्थापनासाठी पालिकेने सन २००२ साली बजाज  फाऊंडेशनबरोबर एक करार केला होता. मात्र या करारातील अनेक त्रुटी आता निर्दशनास आल्या आहेत. या म्यूझियमचे व्यवस्थापन बजाज  फाऊंडेशने हे कोणत्याही कार्यक्रम आयोजित करताना सदर कमिटीच्या अध्यक्ष असणाऱ्या महापौरानाही विश्वासात घेत नाही. त्यांनी घेल्या महिन्यातच फेंशन शो चे अयोजान परस्पर कोणलाही विश्वासात न घेत केले होते. मात्र हि बाब महापौरांना समजताच त्यांनी सदर फेंशन शो स्वतः पुढाकार घेऊन रद्द करायला लावायचे यशोधर फणसे यांनी सांगितले. 

दरम्यान बजाज  फाऊंडेशनबरोबर करार आज जरी रद्द करण्यात आला असला तरी नवीन करार होईपर्यंत सहा महिने काळजीवाहू तत्वावर बजाज  फाऊंडेशन भाऊ दाजी लाड म्यूझियमचे व्यवस्थापन पाहणार आहे असे फणसे यांनी स्पष्ट केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages