बाजार व उद्यानच्या अध्यक्षपदी भंडारी, विधीच्या अध्यक्षपदी पारकर तर महिला व बाल कल्याणच्या अध्यक्षपदी संजना मुणगेकर यांची निवड - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बाजार व उद्यानच्या अध्यक्षपदी भंडारी, विधीच्या अध्यक्षपदी पारकर तर महिला व बाल कल्याणच्या अध्यक्षपदी संजना मुणगेकर यांची निवड

Share This
मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सन २०१५-१६ च्या बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्ष पदासाठी आज (दिनांक १७ एप्रिल २०१५) झालेल्या निवडणुकीत सेना-भाजप- रिपाई (आठवले गट) महायुतीचे उमेदवार अजित दामोदर भंडारी हे १९ मते मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या सुषमा कमलेश राय यांना १० मते मिळाली. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी भाजप-सेना- रिपाई (आठवले गट) महायुतीचे उमेदवार मुकेश मिस्त्री हे १९ मते  मिळवून विजयी झाले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या उमेदवार संध्या विपुल दोशी यांना १० मते मिळाली.  या निवडणुकीत २९ सदस्यांनी भाग घेतला. ५ सदस्य अनुपस्थित होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत २ सदस्य तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत १ सदस्य तटस्थ राहीले. तसेच उपाध्यक्षपदाच्या मतदानाच्यावेळी १ सदस्य अनुपस्थित होते.

विधी समितीच्या अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत भाजप-सेना- रिपाई (आठवले गट) महायुतीचे उमेदवार कृष्णा (महेश) पारकर यांना १९ मते मिळून ते विजयी झाले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार मनोज जामसुतकर यांना १० मते मिळाली. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेना-भाजप- रिपाई (आठवले गट) महायुतीचे उमेदवार शेख इलियास बशीर यांना १९ मते मिळून ते विजयी झाले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या उमेदवार प्रतिक्षा राजु घुगे यांना १० मते मिळाली. या निवडणुकीत एकूण २९ सदस्यांनी भाग घेतला. ६ सदस्य अनुपस्थित होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १ सदस्य तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणतेही सदस्य तटस्थ नव्हते. उपाध्यक्षपदाच्या मतदानाच्यावेळी १ सदस्य अनुपस्थित होते.

महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत सेना-भाजप-रिपाई (आठवले गट) महायुतीच्या उमेदवार संजना किशोर मुणगेकर या १९ मते मिळवून निवडून आल्या, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या बिनिता मेहूल वोरा यांना ९ मते मिळाली. महिला व बालकल्याण समितीच्या उपाध्यक्ष पदी महायुतीच्या बिना दोशी या १९ मते मिळवून निवडून आल्या, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आघाडीच्या रिद्धी खुरसंगे यांना १० मते मिळाली. महिला व बाल कल्याण समितीच्या एकूण ३५ सदस्यांपैकी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एकूण २८ तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एकूण २९ सदस्यांनी सहभाग घेतला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ७ तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत ६ सदस्य अनुपस्थित होते. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages