आंबेडकर - आठवले गटातील वादाचा कॉलेजला फटका
मुंबई / अजेयकुमार जाधव / JPN NEWS
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एजुकेशन सोसायटीच्या मुंबईतील फोर्ट येथील सिद्धार्थ कला आणि वाणिज्य महाविद्यालयात आजी माजी प्राचार्यात भर कॉलेजातच तुंबळ हाणामारी झाल्याने गेली दशकभर वादात सापडलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीची उरलीसुरली अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
मुंबई / अजेयकुमार जाधव / JPN NEWS
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एजुकेशन सोसायटीच्या मुंबईतील फोर्ट येथील सिद्धार्थ कला आणि वाणिज्य महाविद्यालयात आजी माजी प्राचार्यात भर कॉलेजातच तुंबळ हाणामारी झाल्याने गेली दशकभर वादात सापडलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीची उरलीसुरली अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
मुंबईत फोर्ट आणि वडाळा या दोन्ही िठकाणी पीपल्सची चार महाविद्यालये कार्यरत आहेत. संस्थेवरील वर्चस्वावरुन बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर गट आणि रामदास आठवले गट यांच्यामध्ये गेले दशकभर वाद सुरु आहे. या वादात प्रकाश आंबेडकर यांचे लहान भाऊ आनंदराज आंबेडकर यांनीही काही वर्षापूर्वी उडी घेवून संस्थेवर आणि महाविद्यालय ताब्यात घेतले आहे. आंनदराज आंबेडकर आिण िरपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांच्यात तीन वर्षे संघर्ष चालू आहे. सध्या या चार महाविद्यालयांवर आंबेडकर गटाचे वर्चस्व आहे.
आठवले गटाचे प्राचार्य कृष्णा पाटील यांना २०१३ मध्ये िवद्यार्थ्यांकडून वाढीव शुल्क वसूल केल्याप्रकरणी िनलंबीत करण्यात आले आहे. त्यामुळे आनंद भवनचा कारभार आंबेडकर गटाचे एम. यु. म्हस्के हे प्रभारी प्राचार्य पाहतात. प्रभारी प्राचार्य असलेल्या म्हस्के यांच्यावर निलंबित प्राचार्य कृष्णा पाटील यांनी काही गुंडाच्या मदतीने गुरुवारी महाविद्यालयातच हल्ला केला. केबीनमध्येच त्यांना गंभीर मारझोड करण्यात आली. यामुळे म्हस्के यांच्या समर्थकांनी पाटील गटावर हल्ला केला. हा सर्व प्रकार कॉलेज चालू असताना झाला.
त्यांनतर दोन्ही गटांनी एकमेकांच्या िवरोधात आझाद मैदान आिण मीरा रोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलीसांनी अदखलपत्र गुन्हा नोंदवला असून कोणासही अटक केलेली नाही. माझ्या घरी येऊन िनलंबीत प्राचार्य कृष्णा पाटील यांनी माझा राजीनामा लिहून घेतल्याचा आरोप प्रभारी प्राचार्य म्हस्के यांनी केला आहे. तर मी प्राचार्य असताना म्हस्के हे जबरदस्तीने कारभर पाहात आहेत, असा आरोप पाटील यांनी केला आहे.
पीपल्स संस्थेचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. आंबेडकर आणि आठवले गट संस्थेचे खरे िवश्वस्त आपणच असल्याचा दावा करत आहेत. दोघांंच्या वादात मात्र बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या नामवंत अशा शिक्षण संस्थेची मात्र वाट लागली आहे.





