मोनो रेल्वे प्रकल्पाची चौकशी करण्यात यावी - खासदार किरीट सोमय्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मोनो रेल्वे प्रकल्पाची चौकशी करण्यात यावी - खासदार किरीट सोमय्या

Share This
मुंबई : मुंबईत मोठा गाजावाजा करून सुरू केलेली मोनो रेल्वे निश्‍चित कोणासाठी? असा प्रश्न पडला आहे. 'कॅग'च्या अहवालात या प्रकल्पाबाबत ठपका ठेवण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापनाची कोणतीही सक्षम यंत्रणा या प्रकल्पात दिसून येत नाही. या प्रकल्पाचा महिन्याचा तोटा दीड कोटी रुपये असल्याची बाब गंभीर असल्याचे सांगत भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई मोनो रेल्वे प्रकल्पाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. 


मोनोच्या वडाळा ते सातरस्ता या दुसर्‍या टप्प्यासाठी १९00 कोटी खर्च प्रस्तावित होता. आता या प्रकल्पाची किंमत ३१00 कोटींपर्यंत वाढली आहे. मात्र असे असूनही कामाची गुणवत्ता योग्य प्रकारे राखली गेलेली नाही. कॅगच्या अहवालातही प्रकल्पाबाबत गंभीर ठपके ठेवण्यात आले आहेत. मोनो रेल्वेच्या वाहतूक खंडित होण्याच्या घटना गेल्या १५ महिन्यांत ६ वेळा घडल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापनाची कोणतीही सक्षम यंत्रणा असल्याचे यात दिसून येत नाही. मोनो रेल्वेला दैनिक प्रवासी तिकीट खर्च मिळतो २ लाख, मात्र दैनिक वाहतूक खर्च हा ७ लाख आहे. त्यामुळे दररोजचा ५ लाखांचा तोटा पकडून तो महिना दीड कोटी इतका तोटा होतो. त्यामुळे या मोनो रेल्वे प्रकल्पाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages