नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ‘श्रमसेवा २०१५’ पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. आपल्या श्रम आणि सेवेने उपेक्षित वर्गातल्या महिलांची उन्नती करणाऱ्या महिलेला किंवा महिलांच्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो.
आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, रुग्ण, अनाथ अशा वंचित महिलांसाठी कार्य करणाऱ्या महिलांना किंवा महिलांच्या संस्थांनी आपल्या कार्यांची संपूर्ण माहिती, फोटो, वृत्तपत्र कात्रणे, सीडी इत्यादीसह आपला प्रस्ताव विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या विहित नमुन्याप्रमाणे दि. ३० मे २०१५ पूर्वी विद्यापीठाकडे पाठवावे असे आवाहन करण्यातआले आहे. रोख एकवीस हजार रुपये, सन्मानचिन्हव सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.प्रस्ताव प्रमुख, विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्र,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक४२२ २२२ या पत्त्यावर पाठवावेत. अधिक माहितीसाठी ०२५३ - २२३०१२७,९४२२२४७२९१ या क्रमांकावर किंवाdir_dsw@ycmou. digitaluniversity.ac संपर्क साधावा असे आवाहन प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे. अधिक माहितीसाठीycmou.digitaluniversity.ac संकेतस्थळास भेट द्यावी.

