आमदार निवासाच्या ५ व्या माळ्यावरून पडून सफाई कामगाराचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आमदार निवासाच्या ५ व्या माळ्यावरून पडून सफाई कामगाराचा मृत्यू

Share This
मुंबई : अनेक प्रकरणात गाजलेल्या मनोरा आमदार निवासाच्या ५ व्या माळ्यावरून पडून सफाई कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या प्रकरणाचा अधिक तपास कफ परेड पोलीस करीत आहेत.


कफ परेड येथील मनोरा आमदार निवासातील सफाई कामगार विजय माळी (३५) हे गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान मनोरा आमदार निवास या इमारतीच्या ५ व्या माळ्यावरील गॅलरीच्या कट्टय़ावर बसले होते. त्या वेळी त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले. त्यांच्या डोक्याला व संपूर्ण शरीराला जखमा झाल्या होत्या. माळी यांना तत्काळ उपचारासाठी जी.टी. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास कफ परेड पोलीस करीत आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages