मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून काढण्यात येणार्या १0६३ घरांच्या सोडतीत ८ दिवसांत ४१ हजार ८८0 अर्जदारांनी नोंदणी केली असून, ऑनलाइन अर्ज स्वीकृतीला दोन दिवसांत १८ हजार ६७४ अर्जदारांनी प्रतिसाद दिला आहे. त्यापैकी २४५६ अर्जदारांनी ऑनलाइन अनामत रक्कम भरल्याचे स्पष्ट झाले आहे.
ऑनलाइन अर्ज नोंदणीला आठवड्याभरानंतर ६९८0४ अर्जदारांनी प्रतिसाद दिला आहे. त्यापैकी विविध कारणांसाठी १३१८ अर्जदार नाकारण्यात आले असून, ४0४७७ अर्जदारांची नोंदणी निश्चितरित्या यशस्वी झाली आहे. मात्र ही प्रक्रिया संकेतस्थळावर सातत्याने सुरू असल्याने नाकरण्यात येणारे अर्जही दुरुस्तीनंतर यशस्वी ठरत आहेत. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर हजारो अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला प्रतिसाद दिला. गुरुवारी सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत कोकण मंडळातील १0७ व मुंबई मंडळातील १८५६७ अर्ज करण्यात आले आहे त्यापैकी कोकण मंडळातील ५ व २४५१ मुंबई मंडळाच्या अर्जदारांनी ऑनलाइन अनामत रक्कम भरली आहेत, तर १९ अर्जदारांनी डीडीने अनामत रक्कमेचा भरणा केला आहे. म्हाडाच्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने सोडत पार पडावी, यासाठी अद्ययावत यंत्रप्रणालीचा वापर करण्यात आला आहे. म्हाडा सोडतील गेल्या काही वर्षापासून नोंदणी पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे.