मुंबई : मुंबई पोलीस दलात असलेल्या भ्रष्ट पोलीस अधिकारी व कर्मचार्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू असून, येत्या ३0 मेपर्यंत ते पूर्ण होणार आहे. ज्या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांची नावे काळय़ा यादीत येतील त्यांना पोलीस ठाण्यात ड्युटी न देता त्यांना साईड पोस्टिंग दिली जाईल, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यामुळे मारियांच्या काळय़ा यादीत आपले तर नाव नाही ना, या भीतीने मुंबई पोलीस दलातील अनेक पोलीस धास्तावले आहेत.
मुंबई पोलीस दलात पोलीस अधिकारी व कर्मचारी मिळून ५0 हजार ४६0 मनुष्यबळ आहे. त्यापैकी काही पोलीस अधिकारी, कर्मचार्यांच्या भ्रष्ट वागण्यामुळे संपूर्ण पोलीस दलाची बदनामी होत आहे. ही बदनामी टाळण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी पोलीस दलातील भ्रष्ट पोलिसांची काळी यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचार्यांची यादी तयार करण्यासाठी स्पेशल ब्रँच तयार करण्यात आले आहे. या ब्रँचला पोलीस ठाण्यातील पोलिसांबरोबरच क्राईम ब्रँचमधील पोलीस अधिकारी व कर्मचार्यांची नावेदेखील देण्याचे आदेश देण्यात आले असून, ही यादी ३0 मेपर्यंत तयार होईल, अशी माहिती मारिया यांनी दिली. ज्या पोलिसांचे रेकॉर्ड चांगले नाही, ज्यांच्यावर आरोपाचा ठपका ठेवण्यात आला आहे, अशा पोलिसांचे नाव काळय़ा यादीत टाकण्याचे आदेश मारिया यांनी दिले आहेत.