भारतात दरवर्षी १९ कोटी ४0 लाख नागरिकांची उपासमार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 May 2015

भारतात दरवर्षी १९ कोटी ४0 लाख नागरिकांची उपासमार

नवी दिल्ली : जागतिक अर्थव्यवस्थेच्या पटलावर झपाट्याने उदयास येणार्‍या भारतात दरवर्षी १९ कोटी ४0 लाख नागरिकांना उपासमार सहन करावी लागते. त्यामुळे भारत उपासमारीत अव्वल ठरला आहे, अशी धक्कादायक बाब संयुक्त राष्ट्राच्या एका वार्षिक अहवालाद्वारे पुढे आली आहे.

१९९0 ते २0१५ या कालावधीत भारतातील उपाशीपोटी राहणार्‍या लोकांची संख्या लक्षणीय घटली आहे. १९९0-९२ दरम्यान भारतात २१0.९ दशलक्ष नागरिकांना उपासमारीचा सामना करावा लागत होता. तो आता २0१४-१५ मध्ये १९४.६ दशलक्षापर्यंत घसरला आहे, असे संयुक्त राष्ट्राच्या अन्न व कृषी संघटनेने (एफएओ) आपल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. भारताने या बाबतीत 'महान प्रगती' केली असली तरी, 'एफएओ'नुसार भारतात अद्याप १९४ दशलक्ष नागरिकांना उपासमार सहन करावी लागते. भारताच्या विविध सामाजिक योजना उपासमार व दारिद्रय़ाचा यशस्वी सामना करतील, अशी आशाही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. चीनने या बाबतीत भारतापेक्षा सरस कामगिरी केली आहे. चीनमध्ये १९९0-९२ या कालावधीत २८९ दशलक्ष लोकांना उपासमार सहन करावी लागली. हा आकडा २0१४-१५ मध्ये १३३.८ एवढी खाली घसरला आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS