भुलाभाई देसाई रोडवरील चार हुक्का पार्लर्स 'सील' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 May 2015

भुलाभाई देसाई रोडवरील चार हुक्का पार्लर्स 'सील'

मुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील प्लॉट सार्वजनिक हितासाठी राखीव असताना, तो बळकावून तेथे इमारत बांधून त्यात उभारलेल्या चार हुक्का पार्लर्सवर अखेर पोलीस आणि पालिकेने गुरुवारी कारवाई केली. सर्व चारही पार्लर्स 'सील' करण्यात आले आहेत. तसेच पालिकेच्या आरोग्य विभागानेही पार्लर्सविरोधात कारवाई केली आहे. 

सार्वजनिक पार्किंग, सार्वजनिक प्रसाधनगृह आणि समाजकल्याण केंद्र यासाठी या प्लॉटचा वापर होणार होता. यासाठी तो २00९ मध्ये विकासकाला बांधकामासाठी देण्यात आला. बांधकाम डिसेंबर २0१४ मध्ये पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा पालिकेकडे हस्तांतरित होणार होते; पण तसे झाले नाही. बांधकाम पूर्ण झालेला प्लॉट पुन्हा पालिकेच्या ताब्यात आलाच नाही. तेथे उभारलेल्या 'पॉश' इमारतीमध्ये रेस्टॉरंट्स आणि हुक्का पार्लर्स सुरू करण्यात आली. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी येथे काही दिवसांपूर्वी भेट देऊन, पालिकेच्या स्थानिक विभाग अधिकार्‍यांना येथे कारवाई करण्याची आणि याबाबतचा अहवाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक अधिकार्‍यांनी येथे पाहणी करून, पोलिसांच्या मदतीने चार हुक्का पार्लर्सवर कारवाई करून ती सील केली आणि आरोग्य विभागानेही तेथे कारवाई केली. स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत यावर बरीच चर्चाही झाली होती.

Post Bottom Ad

JPN NEWS