मुंबई : गंभीर गुन्ह्यांचा उलगडा करण्यात नेहमीच आघाडीवर असणार्या मुंबई पोलिसांवरील कामाचा ताण वाढताच आहे. हा वाढता ताणतणाव पोलिसांच्या जीवावर बेतत असल्याची धक्कादायक आकडेवारी उजेडात आली आहे. माहिती अधिकार कायद्याच्या(आरटीआय) माध्यमातून उघडकीस आलेल्या आकडेवारीनुसार, २00२-१२ या दहा वर्षांच्या अवधीत १३४१ पोलिसांचा मृत्यू झाला. कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या सर्वाधिक म्हणजेच ४३८ असून त्यापाठोपाठ आत्महत्येचे (१७४) प्रमाण आहे.
यासंदर्भात शहरस्थित आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडे माहिती मागितली होती. ताणतणावामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण आजही वाढतेच आहे. मुंबई पोलीस दलात २00२-१२ या दहा वर्षांत क्षयरोगाचे १३३ बळी, कर्करोगाचे ९६ बळी, विविध आजार-६१ बळी, प्रदीर्घ आजारपण-५३ बळी, किडनी निकामी-३६ बळी, अतिताण-४१ बळी, नक्षलवादी कारवायांत २७ बळी, मधुमेह-३५ बळी, दहशतवादी हल्ल्यांत ८ बळी, अपघात-२३ बळी अशा प्रकारे पोलिसांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे. कामाचा वाढता ताण पोलिसांच्या हृदयविकाराला निमंत्रण देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ८ एप्रिल रोजी आंबोली पोलीस ठाण्यातील ३७ वर्षीय सहाय्यक निरीक्षक विष्णू राठोड यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. तसेच वाकोला पोलीस ठाण्यात घडलेल्या गोळीबाराच्या प्रकरणामागेही ताणतणाव हेच प्रमुख कारण होते. त्या घटनेनंतरच पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी पोलीस दलातील प्रत्येक कर्मचारी-अधिकार्याची ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर चाचणी करणार असल्याचे घोषित केले होते. मुंबई हे देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर असून या शहरात परप्रांतातून येणार्या लोकांची संख्या वाढतीच आहे. त्यामुळे गुन्हेगारीचा टक्काही वाढत असून त्या गुन्ह्यांचा उलगडा करण्याकामी पोलिसांना अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. अपुर्या मनुष्यबळामुळे अनेकदा पोलिसांच्या 'वीकली ऑफ'वरही गदा येते. त्याचबरोबर वरिष्ठांकडून कनिष्ठ कर्मचार्यांची होणारी छळवणूकही नवीन बाब नाही. या सर्व बाबींकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी केली आहे