काळबादेवी आगीत एका अधिकाऱ्याचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 May 2015

काळबादेवी आगीत एका अधिकाऱ्याचा मृत्यू

मुंबई - काळबादेवी येथील चार मजली इमारतीला शनिवारी (ता. 9) लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला, तर मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यासह सहा जण गंभीर जखमी झाले. बेपत्ता असलेल्या एका अधिकाऱ्याचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. 


आगीत भस्मसात झालेल्या इमारतीचा काही भाग बचावकार्य सुरू असतानाच कोसळल्याने या परिसरात घबराट पसरली होती. अग्निशमन दलाच्या 16 पेक्षा जास्त बंबांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. इमारतीचा काही भाग रात्री कोसळला. तळमजल्यावरील मीटर रूममध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले. बचावकार्याचे नेतृत्व करीत असतानाच मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर, उप अग्निशमन अधिकारी एस. जी. अमिन आणि सहायक अग्निशमन अधिकारी एस. डब्ल्यू. राणे हे आगीच्या ज्वालांमध्ये सापडले. नेसरीकर आणि अमिन या दोघांना बचावपथकाने बाहेर काढून तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. नेसरीकर 40 टक्के, तर अमिन 80 टक्के होरपळले आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS