अग्निशमन दलाच्या शहीद संजय राणे, महेंद्र देसाईंना अखेरचा सलाम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 May 2015

अग्निशमन दलाच्या शहीद संजय राणे, महेंद्र देसाईंना अखेरचा सलाम

मुंबई:  मुंबईतील काळबादेवी परिसरातील गोकुळ निवासमधील इमारत क्रमांक 33 ला लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलाच्या संजय वामन राणे आणि महेंद्र देसाई या दोन अधिकाऱ्यांना वीरमरण आलं. 

बचावकार्य करत असताना अचानक इमारत कोसळल्यानं संजय राणे आणि महेंद्र देसाई हे दोन्ही अधिकारी आगीत सापडले.  संजय राणे हे अग्निशमन विभागामध्ये सहाय्यक विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते तर महेंद्र देसाई हे भायखळ्याच्या केंद्राचे प्रमुख होते. काल रात्री बचावकार्यादरम्यानचं या दोनही अधिकाऱ्यांच्या अंगावर इमारतीचा भाग कोसळला, आणि त्यातचं हे अधिकारी दबले गेले. मध्यरात्री या दोनही अधिकाऱ्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश आलं खरं., मात्र त्यानंतर रुग्णालयात दोघांनीही अखेरचा श्वास घेतला. या दोनही अधिकाऱ्यांना भायखळा अग्निशमनच्या मुख्य कार्यालयाबाहेर शेवटचा निरोप देण्यात आला.

Post Bottom Ad

JPN NEWS