मेहता धक्काबुक्की प्रकरणानंतर पालिका प्रोटोकॉल पाळणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 May 2015

मेहता धक्काबुक्की प्रकरणानंतर पालिका प्रोटोकॉल पाळणार

मुंबई (प्रतिनिधी)- गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना पालिका सुरक्षारक्षकांनी शुक्रवारी धक्काबुक्की केली. हे प्रकरण आता चांगलेच तापणार आहे. यापूढे कोणताही कॅबिनेट मंत्री पालिका मुख्यालयात येणार असल्यास पालिका अधिकारी प्रॉटोकॉलनुसार प्रवेशव्दारावर थांबणार आहेत.


भाजपाचे आमदार राज पुरोहित आणि कॅबिनेट मंत्री प्रकाश मेहता यांनी कुलाबा पाणी प्रश्न आणि भोगदाचाळ पुर्नविसनाच्या मुद्दावर पालिका आयुक्तांची भेट मागितली. ठरलेल्या वेळेत मेहता आणि पुरोहित शिष्ठमंडळासह अतिरिक्त आयुक्तांच्या भेटीला आले. त्यांच्यासोबत मोठा कार्यकत्यांचा समुदाय असल्याने सुरक्षारक्षकांनी त्यांना प्रवेशव्दारावर रोखले. यावेळी कॅबिनेट मंत्री असल्याचे सांगूनही सुरक्षारक्षकांनी ओळखपत्राची मागणी केली. त्यामुळे मेहता चांगलेच संतापले. यांनतर पालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना कानसुनावणी केली. तसेच पालिका अधिकाऱ्यांना प्रोटोकॉलची माहिती न नसल्यास तीचा अभ्यास करावा, असे आदेश दिले. यावेळी सर्वच अधिकाऱ्यांनी मानाखाली घातल्या.

दरम्यान, यापुढे कोणताही कॅबिनेट मंत्री अथवा मंत्री पालिका मुख्यालयात येणार असल्यास पालिका अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलनुसार प्रवेशव्दारावर उभे राहून त्यांचे स्वागत केले पाहिजे, अशी सूचना केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी माना डोलवून होकार दर्शवला. मात्र, हे प्रकरण पालिकेत चर्चेचा विषय बनल्यानंतर आता मंत्रालयातही तापण्याची शक्यता आहे.

कोण होते ते..
मुंबई महानगर पालिका ही देशातील सर्वात मोठी महानगर पालिका आहे. या पालिकेची सुरक्षा सुरक्षारक्षक करीत आहेत. मात्र, या सुरक्षारक्षकांना राज्यातील मंत्र्यांची ओळख नाही. त्यामुळे कोण होते ते अशी कुजबूज सुरक्षरक्षकामध्ये सुरू होती. याचा फटका मात्र कॅबिनेट मंत्री प्रकाश मेहता यांना सहन करावा लागला. 

Post Bottom Ad

JPN NEWS