दोन समिती सभागृहांचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 May 2015

दोन समिती सभागृहांचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई (प्रतिनिधी)- महापालिका मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावर नूतनीकरण करण्यात आलेल्या दोन समिती सभागृहांचे आणि एका सभागृहाचे आज मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलेयाप्रसंगी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे, महापालिका आयुक्त अजोय मेहता, शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती रितू तावडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) संजय देशमुख, उपायुक्त (दक्षता) (प्रभारी) व नगर अभियंता प्रकाश कदम आदी अधिकारी उपस्थित होते.

महापालिका मुख्यालयात दोन समिती सभागृह आणि एका सभागृह बांधण्यात आले आहे. हे दोन्ही सभागृह अनुक्रमे १९८० चौरस फूट आणि १७९५ चौरस फूट आकाराची आहेत. तर तिसरे सभागृह हे १०९० चौरस फूट आकाराचे आहे. ऐतिहासिक व पुरातत्त्व इमारती विद्युत यंत्रणा, दिवे, अग्निप्रतिरोधक यंत्रणा, वातानुकूलन यंत्रणा, ध्वनिक्षेपण यंत्रणा, फर्निचरची सुरेख मांडणी करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक सभागृहात ५० आसनांची व्यवस्था आहे. याकरिता ३ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च केले आहेत. केवळ सहा महिन्यात हे काम पुर्ण करण्यात आल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS