नौदल मुख्यालयाजवळ वाहतूक बेटावर ‘विक्रांत’ चे धातूशिल्परुपी स्मारक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नौदल मुख्यालयाजवळ वाहतूक बेटावर ‘विक्रांत’ चे धातूशिल्परुपी स्मारक

Share This
मुंबई, प्रतिनिधी -
देशाची पहिली विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ वरील सामुग्रीतून दक्षिण मुंबईत नौदलाच्या मुख्यालयाजवळ लायन प्रवेशद्वारासमोरील वाहतूक बेटावर धातूशिल्परुपी स्मारक उभारण्यास महापालिका गटनेत्यांच्या सभेने मंजुरी देण्यात आली आहे.


     ‘आयएनएस विक्रांत’ ही विमानवाहू युद्धनौका मोडीत निघाली असली तरी या युद्धनौकेवरील सुमारे दोन टन सामुग्री नौदलातून सेवानिवृत्त कमोडोर एम. भादा यांनी विकत घेतली आहे. नामवंत धातू शिल्पकार अर्झान खंबाटा यांच्या सहकार्याने या सामुग्रीतून दक्षिण मुंबईत नौदलाच्या मुख्यालयाजवळ वाहतूक बेटावर देखणे स्मारक उभारण्याचा कमोडोर भादा यांचा मानस आहे. तसे पत्र भादा यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष फणसे यांना लिहिले होते. सदर विषय गटनेत्यांच्या सभेपुढे ठेऊन त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती फणसे यांनी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांना केली. आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांची संयुक्त बैठक महापौर दालनात आज सोमवारी  झाली.
     
वाहतूक बेट निश्चितीला मान्यता देणे आणि महापालिकेच्या पातळीवरील बाबींना आवश्यक ते सहकार्य करणे, याकरीता भादा यांनी महापालिकेकडे विनंती केली होती. भादा आणि खंबाटा यांचा पुढाकार लक्षात घेता आणि विक्रांत विमानवाहू युद्धनौकेची कामगिरी व इतिहासातील तिचे स्थान पाहता महापालिकेने त्यांना आवश्यक त्या सर्व परवानगी प्रदान कराव्यात, अशी विनंती फणसे यांनी केली. त्यास सभेने एकमताने मान्यता दिली आहे 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages