झोपडपट्ट्यांत पालिका राबवणार स्वच्छता मोहिम - पाण्याचे नमुनेही तपासणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 June 2015

झोपडपट्ट्यांत पालिका राबवणार स्वच्छता मोहिम - पाण्याचे नमुनेही तपासणार

मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) - :  पावसांत पसरणाऱ्या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून यंदा झोपडपट्ट्यांतील स्वच्छतेकडे विशेष काळजी घेतली जाते आहे. कचरा, तुटलेली, तुंबलेली गटारे, नादुरुस्त असलेली सार्वजनिक शौचालये आदी स्वच्छ करण्यासाठी पालिकेची १५ दिवस मोहीम राबवली जाते आहे. घाटकोपर येथून या मोहिमेला सुरुवात झाली आहे. स्वच्छतेसोबतच जनजागृतीही केली जाते असल्याचे अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी सांगितले.

पावसाळा सुरू झाला की साथीचे आजार झपाट्याने पसरतात. मागील वर्षी डेंग्यू, मलेरियाच्या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवणे पालिकेच्या आरोग्य विभागाला कठीण झाले. झोपडपट्टयातील दूषितपाणी, पाण्याने साचणारी डबकी, तुंबलेली गटारे, अस्वच्छ दुर्गंधी पसरणारी सार्वजनिक शौचालये यामुळे साथीचे आजार पसरतात. त्यामुळे सुरुवातीपासूनच येथील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे पालिकेने ठरवले आहे. शौचालये स्वच्छ केली जातीलच, पण त्याची दुरुस्ती करणे आवश्यक असेल तर ते कामही तातडीने हाती घेतले जाणार आहे. धूर फवारणी वेळोवेळी केली जाईल. तसेच उघडी झाकणे शिवाय डबकी दिसली की ती तात्काळ बुजवली जातील. विशेष म्हणजे अनेक झोपडपट्ट्यांत पावसातून रहिवाशांना दूषित पाणी प्यावे लागते. अशा ठिकाणांची नोंद घेऊन संबंधित विभागाकडून पाण्याचे नमुने घेतले जाऊन तपासणी केली जाईल. आजार पसरू नयेत याची काळजी रहिवाशांनी कशाप्रकारे घ्यायला हवी याबाबत जनजागृतीही केली जाणार आहे. सध्या पावसांत १५ दिवस ही मोहीम राबवली जाईल. पालिकेची रोजच्या यंत्रणेचे काम सुरूच राहणार आहे. पण आवश्यक भासेल तेव्हा पुन्हा अशी मोहीम घेतली जाणार आहे, असेही दराडे यांनी स्पष्ट केले.

-----------
रेल्वेच्या हद्दीतील 117 ठिकाणचा कचरा पालिका उचलणार  
रेल्वेच्या बाजूला असलेल्या झोपडीधारक रेल्वे पटरीवर, किंवा स्थानकाजवळ कचरा टाकतात. हे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पाणी तुंबणे, साचलेल्या कचऱ्यामुळे साथीचे आजार पसरतात. त्यामुळे येथील कचराही साफ करण्यास पालिकेने तयारी दर्शवली आहे. रेल्वेच्या हद्दीतील 117 ठिकाणी कचरा रेल्वेने एका बाजूला आणून ठेवला. तर तो कचरा पालिकेकडून नियमित उचलला जाईल, असे ठरले आहे. रेल्वे व पालिकेच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली त्यात यावर चर्चा झाली. लवकरच याबाबतची अमलबजावणी होईल.

कांजूर डंपिंगवर तीन हजार मेट्रिक टन कच-यावर प्रकियाकांजुरमार्ग डंपिंग गाऊंडवर 9 हजार मेट्रिक टन कचऱयापैकी तीन हजार मेट्रिक टन कचऱयावर बायोरिहव-टर टेव-नोलाॅजीध्दारे शार-त्रोव-त प्रकिया करून त्या कच-याची विल्हेवाट माचॅ पासून लावली जाते कच-यापासून वीजनिमितीॅ करण्याचे ठरविले आहे. देवणार , कांजूर व मुंलूड डंपिंग गाऊंड येथे प्र-तावित आहे. मात्र अध्याप ही जागेची निश्चिती झालेली नाही परवानगीची प्रकिया सुरू आहे. कांजूर डंपिंग गाऊंडवर भारतातील सवाॅत मोठा कचरे विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प सध्या सुरू आहे. डंपिंग गाऊंडवरील प्रदुषणाबाबतच्या तक्रारी पाहता निरी या संस्थेकडून आपण प्रदुषणाबाबत अभ्यास अहवाल मागवून प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यानुसार उपाययोजना करीत आहोत त्यामुळे तकारी कमी होतील असे ही पल्लवी दराडे यांनी सांगितले

Post Bottom Ad

JPN NEWS