मुंबई शुक्रवार,(प्रतिनिधी):महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १ कोटी २५ लाख ८४ हजार १३९ इतकी असून याव्यतिरिक्त दैनंदिन स्वरुपात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मुंबई बाहेरुन येणाऱया नागरिकांची संख्यादेखील मोठी आहे. या सर्व लोकसंख्येला विविध नागरी सेवा-सुविधा पुरविण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिके द्वारे यशस्वीपणे पार पाडली जात आहे.
मुंबई महापालिका क्षेत्राची सध्याची दैनंदिन पाण्याची गरज ही सुमारे ४,२०० दशलक्ष लिटर्स इतकी आहे. सध्या बृहन्मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणारे एकूण ७ तलाव (धरण) आहेत. यामध्ये मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी, मध्यवैतरणा, भातसा व अप्पर वैतरणा या तलावांचा (धरणांचा) समावेश आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला सुयोग्यप्रकारे परिपूर्ण पाणीपुरवठा व्हावा, यासाठी इ.स. २०४० मध्ये महापालिका क्षेत्राची लोकसंख्या किती असेल? याचा शास्त्रीय पद्धतीने अंदाज बांधून त्यानुसार महापालिका क्षेत्रासाठीच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन व नवीन धरणे प्रस्तावित करण्यात आले आहेत. या नियोजनाबाबत आणि बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याबाबत अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण व महत्त्वाच्या बाबींचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
मुंबई शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन मुंबई शहरा साठीच्या पाणीपुरवठ्याच्या संभाव्य गरजेनुसार नवीन ४ धरणे बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. प्रस्तावित करण्यात आलेली नवीन ४ धरणांमध्ये पिंजाळ, गारगाई या २ धरणांचा समावेश आहे. तर दमणगंगा-पिंजाळ या नदीजोड प्रकल्पावर २ धरणे बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामध्ये असणाऱया खिडसे परिसरात पिंजाळ नदीवर हे धरण बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. २०५५ हेक्टर्सचा परिसर समाविष्ट असणाऱया पिंजाळ प्रकल्पातून दररोज ८६५ दशलक्ष लिटर्स इतके पाणी उपलब्ध होणे अंदाजित आहे. वर्ष २०१७-१८ या वर्षात पिंजाळ प्रकल्पाची सुरुवात होणे अपेक्षित असून वर्ष २०२५-२६ मध्ये प्रकल्प पूर्णत्वास जाणे अपेक्षित आहे.
गारगाई प्रकल्पातून दररोज ४४० दशलक्ष लिटर्स इतके पाणी उपलब्ध होणे अंदाजित आहे.वर्ष २०१७-१८ या वर्षात गारगाई प्रकल्पाची सुरुवात होणे अपेक्षित असून वर्ष २०२२-२३ मध्ये हा प्रकल्प पूर्णत्वास जाणे अपेक्षित आहे.
यामध्ये नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यामध्ये असणाऱया भुगड गावाजवळील दमणगंगा नदीवर ८५१.५० मीटर्स लांबीचे धरण आणि पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामध्ये असणाऱया बेहाडपाडा या गावाजवळील वाघ नदीवर ६१८.२० मीटर्स लांबीचे खारगीहिल धरण बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. दमणगंगा, पिंजाळ जोड प्रकल्पांतर्गत भुगड धरणापासून खारगीहिल धरणापर्यंत १७.४८८ कि.मी. लांबीचा जलबोगदा तसेच खारगीहिल ते पिंजाळ प्रकल्पापर्यंतचा सुमारे २५.२२४ कि.मी. लांबीचा जलबोगदा बांधण्याचे देखील प्रस्तावित आहे. दमणगंगा, पिंजाळ जोड प्रकल्पामुळे दररोज १५८६ दशलक्ष लिटर्स इतके पाणी उपलब्ध होणे अपेक्षित आहे.
राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाद्वारे (National Water Development Authority) व महापालिकेच्या सहकार्याने पूर्णत्वास जाणे प्रस्तावित आहे. राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाच्या (N.W.D.A.) अहवालानुसार हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास ८ वर्षे इतका कालावधी लागणे अपेक्षित आहे. वरील तपशीलानुसार ४ धरणाचे प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास इ.स. २०४० मध्ये महापालिका क्षेत्राची पाण्याची गरज भागविणे शक्य होणार आहे. यापैकी गारगाई प्रकल्पातून दररोज ४४० दशलक्ष लिटर्स, पिंजाळ प्रकल्पाद्वारे ८६५ दशलक्ष लिटर्स तर दमणगंगा-पिंजाळ या जोड प्रकल्पातील २ धरणांमधून १५८६ दशलक्ष लिटर्स याप्रमाणे एकूण २८९१ दशलक्ष लिटर्स पाणी दररोज उपलब्ध होणे शक्य होणार आहे.