बोगदा चाळीतील रहिवाशांची देहदानाची शपथ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 June 2015

बोगदा चाळीतील रहिवाशांची देहदानाची शपथ

मुंबई : परळ येथील बोगदा चाळीतील बेघर झालेले रहिवासी गेली ४६ दिवस आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. एवढे दिवस होऊन पालिका आणि सरकारला जाग आली नाही. मात्र, या परिस्थितीतही रहिवाशांनी हार मानली नसून आंदोलन सुरूच ठेवण्याचा त्यांनी निश्‍चय केला आहे. दरम्यान, रहिवाशांनी आंदोलन सुरू असताना देहदान आणि अवयव दानाची शपथ घेत नवा पायंडा निर्माण केला आहे.

'आमच्या प्राणाची राखरांगोळी झाली तरी चालेल; पण मराठी माणसांना उद्ध्वस्त करण्याचा डाव आम्ही कदापिही यशस्वी होऊ देणार नाही. तसेच मरणोत्तर नेत्रदान, अवयव व देहदान करून लढा देऊ,' अशी शपथ रहिवाशांनी या वेळी घेतली. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत होईल. या वेळी डॉ. लवेश जाधव, प्रा. अश्‍विनी तोरणे, डॉ. आशीष भोसले, सामाजिक कार्यकर्ते किशोर जगताप आणि ज्योती बडेकर आदी उपस्थित होते

Post Bottom Ad

JPN NEWS