रेन वॉटर हार्वेस्टिंगने कुर्ला टर्मिनसमधील पाण्याची तहान भागवली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 June 2015

रेन वॉटर हार्वेस्टिंगने कुर्ला टर्मिनसमधील पाण्याची तहान भागवली

मुंबई : 'रेन वॉटर हॉर्वेस्टिंग'साठी मुंबई महापालिका वारंवार आवाहन करत असली तरी त्याकडे सत्याने दुर्लक्ष केले गेले आहे. मुंबईकर नागरिक  आवाहनाकडे दुर्लक्ष करत असताना मध्य रेल्वेने ही योजना राबवून गजबजलेल्या कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकातील ४0 टक्के पाण्याची तहान भागवली आहे. ही योजना सुरू केल्याने वार्षिक १ कोटी ४४ लाख रुपयांची बचत होईल, असा दावा मध्य रेल्वेने केला आहे. 

कुर्ला एलटीटी स्थानकाची व्याप्ती बरीच मोठी असून, तब्बल १२ एकरांत स्थानक फलाट आणि अन्य परिसर आहे. स्थानकात दररोज येणार्‍या व जाणार्‍या गाड्यांची स्वच्छता व त्यांची देखभाल, परिसरात असणार्‍या झाडांना पाणी तसेच स्वच्छतागृहांत किमान १८ लाख लिटर पाण्याची गरज आहे. पण एवढे पाणी उपलब्ध होणार नसल्याने रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपाय रेल्वे अधिकार्‍यांना सापडला आणि त्यांनी यावर लक्ष केंद्रित केले. संपूर्ण १२ एकर परिसरात पाणी मिळावे यासाठी सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत एक मीटर लांब आणि दीड मीटर रुंदीचे चर खणण्यात आल्यानंतर, बोअरवेल पाण्याचाही पर्याय जोडण्यात आला. रेन वॉटर हार्वेस्टिंग झाल्यानंतर मिळणारे पाणी वापरण्याजोगे असण्यासाठी चर खणताना तेथे दगडांची रास रचली. यामुळे पाणी आपोआपच गाळून मुरते व ते दैनंदिन वापरण्यात येते, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. या योजनेमुळे एलटीटीला ४0 टक्के पाणी उपलब्ध होणार असून, दरमहा किमान १२ लाख यानुसार वार्षिक एक कोटी ४४ लाख रुपयांची बचत होईल, असे पाटील यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS