मुंबईकरांच्या पाणी पट्टीत आठ टक्क्याने वाढ होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 June 2015

मुंबईकरांच्या पाणी पट्टीत आठ टक्क्याने वाढ होणार

मुंबई ( प्रतिनिधी ) - मुंबईकरांनमु 24 तास पाणी पुरवठा केला जाईल असे आश्वासन  देणाऱ्या पालिकेतील सत्ताधारी शिवसेना - भाजपाने मुंबईकरांची घोर फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतम 24 तास पाण्याचा पत्ता नसताना मात्र पाण्याच्या दरात दामदुपटीने वाढ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे तसा प्रस्ताव तयार करून तो र-थायी समितीच्या मंजूरीसाठी सादर केला आहे. र-थायी समितीने हा प्रस्ताव मंजूर केला तर मुंबईकरांच्या पाणी पट्टीत आठ टक्के वाढ होणार असून मुंबईकराचा  खिसा चांगलाच खाली होणार  आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सुमारे दिडकोटी जनता राहत असून या जनतेला पालिका दररोज 3700 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करत आहे त्यासाठी पालिकेला दरवर्षी प्रशासकीय खर्च, आर-थापणा खर्च प्रचालन व, परिरक्षण खर्च, वीज आणि दुरुस्ती व देखभाल खर्च वाढत आहे त्यामुळे जून 2012 मध्ये पालिकेने दरवर्षी पाणी पट्टीत आठ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्त्या प्रमाणे 2013 मध्ये आठ टक्के वाढ करण्यात आली मात्र 2014 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आल्याने ही दरवाढ टळली होती मात्र यावर्षी 16 जून पासून सध्या लागू असलेल्या पाणी पट्टीच्या दरात आठ टक्के वाढ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे इमारती चाळी यांमधील हजार लिटर मागील पाण्याचे दर  4.32 रुपयांवरून 4.66 रुपयांवर  जाणार आहे. 

झोपडपट्टी , व्यावसायिक संस्था , कारखाने , हॉटेल , या सवाॅच्या पाणी पट्टीत सरसकट आठ टक्के वाढ होणार आहे तसेच मुंबई कराना पाणी पट्टीच्या तुलनेत 60 टक्के मल:निसारण आकार ध्यावा लागत होता या आथिॅक वषाॅत तो 70 टक्के करण्यात आला आहे.  पाणी पट्टी वाढल्यास मल:निसारण आकारही जादा भरावा लागणार आहे त्यामुळे माचॅ च्या तुलनेत गाहकांना 14 टक्के जादा पैसे भरावे लागणार आहेत मुंबईकरांवर  ही दरवाढ लादली जात असल्यामुळे मुंबईकरांचे पाणी वषाॅला महाग होत चालले आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला चांगलीच कात्री लागतआहे पालिकेतील सत्ताधारी शिवसेना - भाजपाने मुंबईकरांना स 24 तास पाणी देण्याचे आश्वासन दिले होते मात्र अध्याप या आश्वासनाची पुतॅता केली नाही  उलट सत्ताधारी मुंबईकरांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम करत आहेत या पालिकेच्या निणॅया विरोधात संताप व्यक्त करत आहेत

अशी होणार दरवाढ
सध्याचे दर                                    आता नवे दर
झोपडपट्टी  3.24 रुपये                         3.49 रुपये
इमारती, चाळी 4.32 रुपये                    4.66 रुपये
हॉटेल 64.80 रुपये                           69.98 रुपये
व्यावसायिक संस्था 32.40 रुपये          34.99 रुपये
कारखाने 43.20 रुपये                       46.65 रुपये

Post Bottom Ad

JPN NEWS