म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीमधील भ्रष्टाचाराविरोधात उपोषण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 June 2015

म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीमधील भ्रष्टाचाराविरोधात उपोषण

मुंबई / अजेयकुमार जाधव 
म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीमधून म्हाडाला किती भांडवली मुल्य मिळाले, किती सदनिका मिळाल्या याची माहिती आरटीआय मधून मागवूनही अशी महती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने दिलीप गायकवाड यांनी सोमवार पासून मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरु केले आहे. जो पर्यंत म्हाडाचे अधिकारी खरी माहिती देत नाही तो पर्यंत बेमुदत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
म्हाडाला सुधारित विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) नुसार पुनर्वास झालेल्या उपकर प्राप्त इमारतीमधून अतिरिक्त क्षेत्रफळाच्या सदनिका किंवा भांडवली मुल्य मिळते. हे भांडवली मुल्य किंवा किती सदनिका म्हाडाला मिळाल्या याची माहिती आरटीआय कार्यकर्ते दिलीप गायकवाड यांनी म्हाडाकडून मागवली होती. परंतू म्हाडाने योग्य माहिती दिली नसल्याने गायकवाड यांनी माहिती आयोगा पर्यंत दाद मागितली. माहिती आयोगाचे आदेशही म्हाडाचे अधिकारी मनात नसल्याने आयोगाकडे तक्रार दाखल केली. माहिती आयोगाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले जात नसल्याने अखेर गायकवाड यांनी बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. माहिती आयोगाचे आदेश न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करावे, अश्या अधिकाऱ्यांच्या बेहिशोबी मालमत्तेची सीआयडी कडून चौकशी करावी. सदनिका व पुनर्विकासाची चौकशी करून बिल्डरवर कारवाई करावी, मास्टर लिस्ट व पात्रता धारकांना हक्काच्या सदनिकांचे वाटप करावे इत्यादी मागण्यासाठी उपोषण सुरु असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. सदर उपोषणाला दलित प्यान्थरचे प्रताप रावत, विशाल जोंधळे, विजय येलगड यांनी पाठींबा दिला आहे.  

Post Bottom Ad

JPN NEWS