तीन दिवस मुंबईकरांना धोव-याचे - समुद्रात उसळणार उंच लाटा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 June 2015

तीन दिवस मुंबईकरांना धोव-याचे - समुद्रात उसळणार उंच लाटा

मुंबई  (पतिनिधी) -  आजपासून सतत तीन दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे जर या  कालावधीत मुसळधार पाऊस पडला तर मुंबई जलमय होण्याची शक्यता आहे त्यामुळे या भरतीच्या दिवशी खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिकांनी व मच्छिमार बांधवांनी समुद्रात व समुद्राजवळच्या परिसरात जाऊ नये असे आवाहन पालिकेने केले आहे
    
यंदा पाऊस सरासरी पेक्षा अधिक पाऊस आणि लवकर  होईल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे .त्यामुळे पालिकेने पूरपरिरि-थतीचा अंदाज घेऊन जय्यत तयारीला लागली आहे . जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात पावसाळा सुरू होईल या वेळी ही जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत पडणाऱ्या पावसाळ्यात हायटाइडचा धोका असून सखल भागात पाणी साचण्याची आणि रेल्वेचे टॅक पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. समुद्रात 4. 5 मीटर हून मोठी भरती असताना पाऊस पडल्यास मुंबईतील सखल भाग पाण्याखाली जातात . मोठय़ा भरतीच्या काळात 65 मि . मी . पेक्षा जास्त पाऊस झाल्यास सखल भागामध्ये पाणी तुंबेल त्यामुळे अशा भागामध्ये सावधगिरीच्या उपाययोजना आखण्यात येथ आहे.  मुंबईत दरवर्षी सुमारे 222 ठिकाणी पाणी तुबंण्याची शक्यता आहे. तसेच 40 ठिकाणी पावसाळ्यात पाणी साठल्यास वाहवाहतुकीची कोंडी निर्माण होते . मुंबई सेंट्रल, गॅन्टरोड माटुंगा, माहीम, दादर , वांद्रे , खार, सांताक्रूझ, अंधेरी, दहिसर, नालासोपारा विरार , शिवडी, वडाळा , कुर्ला, गुरू तेज बहादूर नगर , गोवंडी, मानखुर्द, खारघर ,पनवेल , किंग्ज सर्कल , मस्जीद बंदर , सँडहर-टॅ रोड , चिंचपोकळी, परेल,  करी  रोड, सायन, माटुंगा, कुर्ला, विकोळी,  आदी ठिकाणे आहेत.पालिकेने यंदा नालेसफाईची कामे उशिराने सुरू केली आहेत लवकर पाऊस पडला तर मुंबई जलमय होणार आहे. यात कुठे शंका नाही  आज 16 ,17 , आणि 18   जून रोजी समुद्राला चार मीटर पेक्षा जास्त उंचीची भरती येणार आहे  16 जून रोजी दुपारी  12.23  वाजता 4.61 तर 17 जूनला दुपारी 1.06 वाजता  4.61  आणि 18 जून रोजी दुपारी 1.48 , वाजता 4.56  समुद्राला भरती येणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS