विनोद तावडे यांच्या विरोधात बोरीवली पोलिस ठाणेत तक्रार दाखल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विनोद तावडे यांच्या विरोधात बोरीवली पोलिस ठाणेत तक्रार दाखल

Share This

मुंबई । प्रतिनिधी
सुशिक्षित मतदारांना आकर्षित करण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत शिक्षण मंत्री श्री.विनोद तावडे यांनी निवडणुक आयोगास सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात बी.ई. इलेक्ट्रोनिक्स ही बोगस पदवी दाखविली. तसेच निवडणुक प्रचार पत्रकात बी.ई. इलेक्ट्रोनिक्स पदवीधर असल्याचा उल्लेख करून बोरीवालीच्या मतदारांची दिशाभूल आणि फसवणूक केली, याकरिता मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई कॉंग्रेस आणि स्थानिक मतदारांतर्फे आज मंगळवार दि. ३० जून, २०१५ रोजी, सकाळी ११.०० वाजता, बोरीवली पोलिस ठाणे वर धडक मोर्चा काढून शिक्षण मंत्री श्री.विनोद तावडे यांच्या विरोधात भारतीय दंड सहितेचा कलम १८१, ४२० व त्याचप्रमाणे लोक प्रतिनिधित्व कायदा ( Representation Of Peoples Act ) अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली...   


एसीपी सुधाकर पुजारी आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक बुधाजी सावंत यांनी बोरीवलीच्या मतदारांना आणि संजय निरुपम यांना आश्वासन दिले की, विनोद तावडे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राची प्रत निवडणुक आयोगाकडून मागवून येणाऱ्या १५ दिवसात सदर प्रतिज्ञापत्र व निवडणुक प्रचार पत्रकाची शहानिशा करून विनोद तावडे यांच्या विरोधात तक्रार दाखल करू असे सांगण्यात आले आहे. विनोद तावडे यांनी बोरीवलीच्या मतदारांचा विश्वासघात केला आहे, जो पर्यंत बोरीवली पोलिस ठाणेत त्यांच्या विरोधात भारतीय दंड सहितेचा कलम १८१, ४२० व त्याचप्रमाणे लोक प्रतिनिधित्व कायदा ( Representation Of Peoples Act ) अंतर्गत गुन्हा नोंद केला जात नाही, तो पर्यंत विनोद तावडे यांच्या विरोधात सतत आंदोलन करण्यात येईल, असे संजय निरुपम यांनी सांगितले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages