मुंबई । रशीद इनामदार
मानखुर्द मंडाळा परीसरातील अनाधिकृत झोपड्या आज पाडण्यात आल्या.ही कारवाई उप जिल्हाधिकारी व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी संयुक्तपणे केली.
मानखुर्दमधील मंडाळा परिसरात आज अनधिकृत झोपड्यांवर आज कारवाई करण्यात आली.ही जमीन उप जिल्हाधिकार्यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला हस्तांतरीत केली होती.त्यावरील अनधिकृत झोपड्यांना अधिकृत करावे ही मागणी घेऊन ज्येष्ठ समाजसेविका मेधाताई पाटकर यांनी आंदोलन सुरू केले होते. त्यांच्या या आंदोलनाला न जुमानता या अनधिकृत झोपड्या पाडण्यात आल्या.आंदोलनकर्त्यांनी अधिकार्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.पोलिसांना लाठिचार्ज करावा लागला. त्यात दोन आंदोलक गंभीर जखमी झाले. त्यांना पंडित मदन मोहन मालविय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . मुंबई उपनगर उप जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखालील जमीन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला हस्तांतरीत करण्यात आली होती. त्या जमीनीवर सुमारे 250 ते 300 अनधिकृत झोपड्या बांधल्या गेल्या होत्या.या झोपड्या अधिकृत कराव्या ही मागणी घेवुन ज्येष्ठ समाजसेविका मेधाताई पाटकर यांनी आंदोलनातुन लावून धरली होती. त्यांना न जुमानता आंदोलन मोडित काढत ही कारवाई करण्यात आली.मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला . सुमारे 250 आंदोलकांना ताब्यात घेवून कारवाई करण्यात आली.ज्येष्ठ समाजसेविका मेधाताई पाटकर यांच्याशी संपर्क साधुन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.नुकतेच नागपाडा पोलिस ठाण्याहुन बदली होवून आलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक नसिर शेख स्वतः बंदोबस्ताच्या ठिकाणी हजर राहून काम पहात होते.

