मुंबई : राज्य वीज नियामक आयोगाच्या मान्यतेनंतर रिलायन्स इन्फ्रा या वीज कंपनीने एअरकंडिशनर वापरणार्या घरगुती ग्राहकांच्या वीजदरात ५ ते ७ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. तर मध्यमवर्गीय घरगुती वीजग्राहकांच्या वीज दरात २ टक्क्यांची कपात केली असल्याची माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.
एसी वापरणार्या ग्राहकांच्या वीज दरात वाढ करताना रिलायन्सने व्यावसायिक वीज ग्राहकांचे वीज दर १३ ते २२ टक्के, औद्योगिक ग्राहकांचे दर ३ ते ५ टक्के, तर उच्चदाब व्यावसायिक ग्राहकांसाठी ४ टक्क्यांनी वीजदर कमी केले आहेत. वीज नियामक आयोगाने मेट्रो, मोनो या सार्वजनिक वाहतुकीच्या वीज दरासाठी वेगळी श्रेणी केली आहे. त्यानुसार मेट्रो आणि मोनोचे वीज दर ७ टक्क्यांनी कमी झाले आहेत. रस्त्यावरील दिवे, शाळा, रुग्णालयांचे दर १७ टक्क्यांपर्यंत कमी केल्याची माहितीही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. टाटा पॉवर कंपनीने दारिद्रय़रेषेखालील ग्राहकांचा वीज दर ३९ टक्क्यांनी कमी करून दिलासा दिल्याचेही ते म्हणाले.