मुंबई : जल वितरण आणि पाणीपुरवठय़ाच्या सुधारणेसाठी महापालिकेच्या जलअभियंता विभागाने एच/पश्चिम आणि टी विभागात भूमिगत जलवाहिन्यांचे सर्वेक्षण 'डिजिटल मॅपिंग'द्वारे सुरू केले आहे. हे काम प्रगतिपथावर असून ते येत्या चार महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे, अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली. ते पूर्ण झाल्यानंतर जलवाहिन्यांचे वय, प्रकार कळेल आणि गळती झाल्यास त्यालगतच्या अन्य नागरी वाहिन्यांचे नुकसान टाळून जलवाहिनीची दुरुस्ती करता येईल, असा पालिकेचा दावा आहे.
'मुंबईत पालिकेतर्फे होणारा पाणीपुरवठा, मलनिस्सारण व पर्जन्य जलनिस्सारण या मुलभूत नागरी सुविधा पुरवण्यासाठी टाकलेल्या भूमिगत वाहिन्यांचे संगणकीय आरेखन (डिजिटल मॅपिंग) करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी ठरावाच्या सूचनेद्वारा पालिकेकडे केली होती. 'या सेवांच्या वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यास तो शोधण्यातच बराच वेळ वाया जातो. परिणामी, पालिका देत असलेल्या सेवांच्या दर्जांवर आणि सुलभतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. यासाठी डिजिटल तंत्रज्ञान वापरून जमिनीखालून जाणार्या प्रत्येक पायाभूत सुविधांच्या प्रत्येक वाहिनीचे संगणकीय आरेखन झाल्यास आणि विविध सेवांच्या वाहिन्या संगणकीय नकाशावर स्वतंत्र रंगात दाखवल्यास संगणकाने त्यांच्या जागा निश्चित केल्यास आणि त्यात काही बिघाड झाल्यास अगदी थोड्या अवधीत तो शोधून काढता येईल, अशी ठरावाची सूचना डॉ. खान यांनी केली होती. जलवाहिन्यांचे सर्वेक्षण केल्यास जलवाहिन्यांचे वय, प्रकार, गळती व दुरुस्ती आणि नवीन जोडण्या आदींचे नोंदणीकरण सुलभ होईल आणि गॅस, मलनिस्सारण वाहिन्या, दूरसंचार व वीजपुरवठा आदी वाहिन्यांची स्थिती समजल्याने रस्ते दुरुस्ती व अन्य कामांमुळे जलवाहिन्यांचे होणारे नुकसान टाळता येऊ शकेल, असा विश्वास जल अभियंत्यांनी व्यक्त केला आहे.