गट संसाधन कंत्राटी कर्मचाऱ्याच्या आंदोलनाकड़े सरकारचे दुर्लक्ष - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गट संसाधन कंत्राटी कर्मचाऱ्याच्या आंदोलनाकड़े सरकारचे दुर्लक्ष

Share This
मुंबई । अजेयकुमार जाधव 
महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र (पाणी व् स्वच्छता) कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यासाठी 29 जुलैपासून आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरु केले असले तरी सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप अध्यक्ष विलास निकम व सचिव लहाणु बेलेकर यांनी केला आहे.

राज्यात पाणी व् स्वच्छता याबाबतची कामे करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर गट संसाधन केंद्र कक्षाची स्थापना 2011 साली करण्यात आली. या कक्षात उच्च शिक्षित कर्मचारी काम करत असले तरी त्यांना 6500 रुपये इतके तूटपूंजे मानधन देण्यात येते मात्र इतर कोणतीही सुविधा देण्यात येत नाही. यामुळे या कर्मचाऱ्याना शासकीय सेवेत कायम करावे, अन्यथा अंशकालीन दर्जा देवून वेतनश्रेणी निश्चित करावी, गट व् समूह समन्वयक याना विस्तार अधिकारी पाणी व् स्वच्छता दर्जा देण्यात यावा, महिलासाठी प्रसुती रजा लागू करावी, भत्ते लागू करावेत, वैद्यकीय सुविधा लागू करावी, भविष्य निर्वाह भत्ता देण्यात यावा इत्यादी मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरु आहे. जो पर्यन्त मागण्या मान्य होत नाही तो हे धरणे आंदोलन सुरूच राहील असे विलास निकम व लहाणु बेलेकर यांनी सांगितले आहे

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages