मुलींच्या जातीच्या दाखल्यांसाठी पालकांची दोन वर्षांपासून वणवण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 July 2015

मुलींच्या जातीच्या दाखल्यांसाठी पालकांची दोन वर्षांपासून वणवण

मुंबई : आपल्या मुलींच्या जातीच्या दाखल्यासाठी गेली दोन वर्षे किशोर गायकवाड हे वणवण भटकत आहेत. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना अद्यापि यश आले नसल्याने ते हतबल झाले आहेत. जातीच्या दाखल्याचे जे नियम आहेत ते शिथील करावेत यासाठी ते लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. 

किशोर माधव गायकवाड यांनी मुलींच्या जातीच्या दाखल्यासाठी मुंबईत अर्ज केला. त्यासाठी त्यांचे वडील व स्वत:चा जातीचा दाखला जोडला, परंतु त्यांना मूळगावी जायला सांगण्यात आले. त्यावर त्यांनी गावी जाऊन रितसर प्रक्रिया पूर्ण केली, पण तिथूनदेखील त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. तेथे तुमच्या वडिलांचा ५0 वर्षांपूर्वीचा जातीचा उल्लेख असलेला पुरावा आणावा तेव्हाच तुम्हाला जातीचा दाखला मिळेल, असे त्यांना सांगण्यात आले. गायकवाड हे अनुसूचित जातीचे असून ते जोगेश्‍वरीला राहतात. मुलींच्या जातीच्या दाखल्यासाठी त्यांनी पुणे-मुंबई असा अनेक वेळा प्रवास केला. पण त्यांच्या या प्रयत्नांना अजून तरी यश आले नाही. मुलींच्या शाळा कॉलेजमध्ये जातीच्या दाखल्यासाठी सतत मागणी होत असताना गायकवाड यांना तो मिळत नाही, यासाठी ते हतबल झाले आहेत. याबाबत गायकवाड यांनी तहसीलदार यांना पत्रव्यवहार करून जातीच्या दाखल्यासाठी होणारी लोकांची हेळसांड थांबवावी, अशी मागणी केली आहे. तसेच जातीच्या दाखल्याचे जे नियम आहेत ते शिथील करावेत यासाठी ते लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS