जन्म प्रमाणपत्र मिळणार तीन दिवसांत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जन्म प्रमाणपत्र मिळणार तीन दिवसांत

Share This
मुंबई : जन्म वा विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी करावी लागणारी महिनाभराची प्रतीक्षा आता टळणार आहे. यापुढे 'राईट टू सर्व्हिस अँक्ट'अंतर्गत जन्म वा विवाह नोंदणी प्रमाणपत्र अवघ्या तीन दिवसांत उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिनाभरापूर्वीच महाराष्ट्र शासकीय सेवा हमी अधिसूचना घोषित केली होती. त्यानुसार नगरविकास विभागाने १५ सेवा नागरिकांना विशिष्ट वेळेत पुरवण्याचे आदेश सर्व शासकीय विभागांना दिले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबर २0१४ रोजी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. तेव्हा त्यांनी भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी व प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी कायद्यात योग्य ती तरतूद करणार असल्याचे जाहीर केले होते. सर्वसामान्य नागरिकांना पारदर्शक, प्रभावी आणि वेळेत शासकीय सेवा पुरवण्यासाठी नवा कायदा करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी त्या वेळी स्पष्ट केले होते. त्यानुसार सर्व शासकीय विभाग, महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला सेवा पुरवण्यासाठी वेळेची र्मयादा आखून देण्यात आली आहे. यासाठी नगरविकास विभागाने १५ सेवांची निश्‍चिती केली आहे. जर विशिष्ट वेळेत माहिती पुरवली गेली नाही, तर संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना जबाबदार धरले जाणार आहे. त्या दोषी अधिकार्‍यांना ५00 ते ५ हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाणार असल्याचे नगरविकास विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. या वेळ र्मयादेची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित प्रशासनाच्या वरिष्ठांकडे असणार आहे. पालिका प्रशासनात सेवा पुरवताना वेळेर्मयादेचे काटेकोर पालन होते का, हे पाहण्याची जबाबदारी पालिका आयुक्तांकडे असणार आहे. तसेच नागरिकांना आपल्या अर्जाची सद्यस्थितीही जाणून घेता येणार आहे. यासाठी नागरिकांना युनिक क्रमांक पुरवला जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

जन्म प्रमाणपत्र ३ दिवस
मृत्यू प्रमाणपत्र ३ दिवस
विवाह नोंदणी प्रमाणपत्र ३ दिवस
मालमत्ता कर प्रमाणपत्र ३ दिवस
ना देयके प्रमाणपत्र ३ दिवस
झोन प्रमाणपत्र ७ दिवस
बांधकाम परवानगी ६0 दिवस
जलजोडणी १५ दिवस
अग्निशमन दलाकडून एनओसी ७ दिवस
अग्निशमन दलाकडून अंतिम एनओसी १५ दिवस

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages