देशभरात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावर बंदी ! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

देशभरात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावर बंदी !

Share This
नवी दिल्ली : प्लास्टिकपासून बनविल्या जाणार्‍या राष्ट्रध्वजांवर सरकारतर्फे लवकरच बंदी लादली जाण्याची शक्यता असून, याविषयीचा आदेश लवकर जारी केला जाणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. पुढील महिन्यात सार्ज‍या केल्या जाणार्‍या स्वातंत्र्यदिनापूर्वीच याविषयीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. याविषयी गृहमंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार लवकरच प्लास्टिकपासून बनलेल्या राष्ट्रध्वजांचा वापर, खरेदी व विक्रीवर बंदी लादण्याचे आदेश जारी करण्याची शक्यता आहे.
स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाला प्रामुख्याने वापरले जाणारे हे प्लास्टिकचे राष्ट्रध्वज नंतर रस्त्यावर तसेच गटारात पडलेले आढळल्याच्या तक्रारींची दखल घेत सरकारकडून हे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे. याविषयाशी संबंधित एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला अशा राष्ट्रध्वजांच्या खरेदी, विक्री व वापरावर निर्बंध लादण्याचे समग्र धोरण आणण्यास गत मार्च महिन्यात सांगितले होते. जनतेत राष्ट्रध्वजाच्या सन्मानाविषयी जागरूकता आणणारे एक समग्र धोरण राज्य सरकारने तयार करावे. ज्याप्रमाणे शालेय पाठय़पुस्तकांत राष्ट्रगीत व प्रतिज्ञा छापली जाते, त्याप्रमाणे राष्ट्रध्वजाच्या सन्मानाविषयीसुद्धा एक संदेश छापण्यात आला पाहिजे, अशी सूचनाही न्यायालयाने केली होती.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages